शिक्रापुरात मैत्रिणीला भेटायला गेलेल्या महिलेचा विनयभंग...

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका मैत्रिणीला भेटायला गेलेल्या महिलेचा मैत्रिणीच्या पतीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

पुणेः शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका मैत्रिणीला भेटायला गेलेल्या महिलेचा मैत्रिणीच्या पतीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांत महिलेने तक्रार दिल्याने पोलिसांनी एका युवकावर गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे शहरात राहणारी महिला शिक्रापूर येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी सदर मैत्रिणीचा पती हा घरी आला. यावेळी त्याने महिलेला 'तू मला आवडतेस; असे म्हणत तिचा विनयभंग केला. महिलेला कपडे बदलताना गुपचूप फोटो काढले. त्यांनतर तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटायला बोलावू लागला. त्यांनतर वारंवार सदर महिलेला धमकी देऊ लागला. मात्र, महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने महिलेचे फोटो व नावाचे महिलेची बदनामी करणारे पोस्टर बनवून महिला पुण्यात राहत असलेल्या सोसायटीमध्ये टाकून दिले. पोस्टर टाकतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. महिलेच्या कुटुंबियांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

महिलेने पुणे पोलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्याने पुणे पोलिसांनी युवकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर प्रकाराचा तपास शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग केला असल्याचे कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलिस अधिकाऱयाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune district crime news women molested at shikrapur shirur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे