आम्ही पोलिस आहोत, या रस्त्याने चोर फिरत आहेत...

पोलिस असल्याची बतावणी करून लांबविले महिलेचे मंगळसूत्र

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पुलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी चीतारे हे करत आहेत.

पुणेः शिक्रापूर (ता. Shirur) पोलिस स्टेशन (Shikrapur Police Station) समोरून पोलिस असल्याची बतावणी करत बँकेच्या अधिकाऱ्यांची कार पळविल्याची घटना ताजी असताना आता शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दोघा युवकांनी पोलिस असल्याची बतावणी करून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दोन अज्ञात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील सरस्वती दरवडे हि महिला काही कामानिमित्त पुणे-नगर महामार्गावरील चोवीस वा मैल येथे आली होती. सदर ठिकाणी दोन युवक आले आणि त्यांनी महिलेला आम्ही पोलिस आहोत, या रस्त्याने चोर फिरत आहेत, असे सांगत तुमच्या गळ्यातील दागिने, हातातील अंगठ्या काढून ठेवा असे सांगितले. महिला गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत असताना त्या युवकांनी द्या आम्ही रुमालात बांधून देतो, असे म्हणून महिलेला मंगळसूत्र रुमालात ठेवण्यास सांगितले. यावेळी महिलेने मंगळसूत्र व अंगठ्या रुमालात ठेवल्या असताना त्या युवकांनी महिलेचे मंगळसूत्र रुमालात न ठेवता फक्त अंगठ्या रुमालात ठेवून महिलेकडे रुमाल दिला आणि पोबारा केला.

अभिमानास्पद! पोलिस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’

या घटनेबाबत सरस्वती संपत दरवडे (वय ५५ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात दोन युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पुलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी चीतारे हे करत आहेत.

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news women gold robbery at shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे