पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील महाबळेश्वर नगर परिसरात सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचे काही नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलिस नाईक संतोष मारकड, रविकिरण जाधव, महेंद्र पाटील यांनी घटना स्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५, अंगात राखाडी रंगाचा ब्लाऊज, हिरव्या रंगाचा परकर, कानात व गळ्यात पिवळ्या धातूचे दागिने असे आढळून पोलिसांनी सदर महिलेबाबत आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत कैलास विश्वास मराठे (वय ५७ वर्षे रा. पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सदर पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune district crime news women body found at shikrapur river
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे