तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने...

तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने दोघांमध्ये वादिवाद झाला.

पुणे: तळेगाव ढमढेरे (ता. Shirur) येथील कमेवाडी या ठिकाणी घराशेजारील बाभळीचे झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बापरे! 'गरुडझेप अकॅडमी'च्या मुलांच्या जेवनात आढळल्या आळ्या...

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कमेवाडी मध्ये राहणारे मंगेश भुजबळ यांनी त्यांच्या घराशेजारील झाड तोडले. यावेळी ऋषिकेश भुजबळ यांनी तोडलेले झाड आमच्या इकडे टाकू नका, असे म्हटल्याने दोघांमध्ये वादिवाद झाला. त्यांनतर वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. दोघा गटांनी कुऱ्हाड घेऊन त्याने मारहाण केल्याने घडलेल्या घटनेत मीना भुजबळ व मंगेश भुजबळ हे दोघे जखमी झाले आहेत.

लॉकडाऊनमध्ये कामधंदा नव्हता अन् पत्नीचे बाळंतपण झाले...

पुण्यातील व्यापाऱयाला लातूरमध्ये लुटले; पण १२ तासातच...

याबाबत दोन्ही गटांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजाराम दत्तात्रय भुजबळ, मंगेश राजाराम भुजबळ, ऋषिकेश अवधूत भुजबळ, मीना अवधूत भुजबळ, अवधूत मारुती भुजबळ, ईश्वर अवधूत भुजबळ यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेश माने हे करत आहेत.

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news two group fighting at shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे