युवकांनी हात करून कंटेनर अडविला अन्...

सणसवाडी येथील फेबर कंपनीमधील माल घेऊन जाण्यासाठी एम एच १२ के पी ५५२७ हा कंटेनर घेऊन कंटेनर चालक अमितकुमार शुक्ला हे ३१ ऑगस्ट रोजी आले होते.

शिक्रापूर (पुणे): सणसवाडी (ता. शिरुर) येथे तिघांनी कंपनीचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला रात्रीच्या सुमारास अडवून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तीन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सातारच्या पोलिस अमंलदाराच्या धाडसाचे होतेय सर्वत्र कौतुक...

सणसवाडी येथील फेबर कंपनीमधील माल घेऊन जाण्यासाठी एम एच १२ के पी ५५२७ हा कंटेनर घेऊन कंटेनर चालक अमितकुमार शुक्ला हे ३१ ऑगस्ट रोजी आले होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शुक्ला हे सदर कंटेनर घेऊन जात असताना येथील पॉलीबॉंड कंपनीच्या गेट समोरुन जात असताना दुचाकी वरुन आलेल्या तिघा युवकांनी शुक्ला यांच्या कंटेनरला हात करून कंटेनर अडविला. याचवेळी दोघेजण कंटेनरमध्ये घुसले आणि त्यांनी चालक शुक्ला यांना हाताने, लाथाबुक्य्यानी मारहाण करत शिवीगाळ करून त्यांच्या जवळील पंधरा हजार सहाशे रुपये बळजबरीने काढून घेतले आणि त्यांनी आणलेल्या दुचाकीहून पळून गेले.

पुणे ग्रामीणच्या महिला पोलिसांसाठी आंनदाची बातमी...

याबाबत अमितकुमार लल्लनप्रसाद शुक्ला (वय ३५ वर्षे रा. पटहनखेडा ता. अचलगंज जि. उन्नाव, उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्याबाबत मोठी बातमी; काय ती पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news three youth stoped container and lo
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे