चोरट्यांनी खिडकीतून दरवाजा उघडत घरात प्रवेश केला अन्...

घरातील पाहणी केली असता कोणीतरी खिडकीची काच उघडून खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.

पुणे: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील महाबळेश्वर नगर येथे घरातील व्यक्ती घरात झोपलेले असतानाही चोरट्यांनी खिडकीची काच उघडून खिडकीतून दरवाजा उघडत घरात प्रवेश करून रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांच्या जाळयात...

शिक्रापूर येथील महाबळेश्वर नगर येथे राहणारे विठ्ठल शिरे व त्यांच्या घरातील व्यक्ती रात्री घरात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास शिरे हे उठले असताना त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे तसेच घराचा दरवाजा तसेच खिडकी उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली असता घरातील तीस हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. घरातील पाहणी केली असता कोणीतरी खिडकीची काच उघडून खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील पैसे चोरून नेल्याचे निदर्शनास आले. 

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

याबाबत विठ्ठल दयाराम शिरे (वय ३५ वर्षे रा. शिक्रापूर महाबळेश्वर नगर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उकळी ता. मेहकर जि. बुलढाणा) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल दांडगे हे करत आहेत.

उसतोड करताना मानवी सांगाडा आढळल्याने उडाली खळबळ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news thief enter the home and robbery at
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे