टेम्पो व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक...

कंपनीचा माल घेऊन पिक अप चालक शंकर वानखेडे या त्याच्या ताब्यातील एम एच १२ जि टी ५५६९ हि पिक अप घेऊन चाकण दिशेने चालले होते.

पुणे: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यावर टेम्पो व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात पिकअप चालक शंकर वानखेडेसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापरे! प्रवासादरम्यान फोन आला अन् सगळंच संपल...

शिक्रापूर येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने सणसवाडी येथील एका कंपनीचा माल घेऊन पिक अप चालक शंकर वानखेडे या त्याच्या ताब्यातील एम एच १२ जि टी ५५६९ हि पिक अप घेऊन चाकण दिशेने चालले होते. केवटे मळा येथे चाकण बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ डी एम १४४८ या टेम्पो चालकाचा समोरील वाहनाला ओहरटेक करत असताना पिकअपला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी पिकअप चालक शंकर वानखेडे (रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला तर पिकअप मध्ये बसलेले मेघा गरुड व संजय गरुड हे दोघे देखील किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

कार खरेदीच्या बहाण्याने युवकाची फसवणूक...

याबाबत अमित ज्ञानेश्वर मिडगुले (वय ३६ वर्षे रा. मिडगुल वाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राकेश मळेकर हे करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news temp and pickup accident shikrapur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे