महिलेने फक्त घरातील स्वयंपाक केला नाही म्हणून...

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कल्पेश राखोंडे हे करत आहे.

पुणे: वाजेवाडी (ता. शिरूर) येथील महिलेने घरातील स्वयंपाक केला नाही म्हणून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करुन जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे प्रशांत मनोहर वाजे, मनोहर शारतीलाल वाजे व किसनाबाई मनोहर वाजे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र; त्यामध्ये...

वाजेवाडी येथील निर्मला वाजे यांनी घरातील स्वयंपाक न केल्याने त्यांचा घरातील व्यक्तींशी वाद झाला. यावेळी झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे घरातील नागरिकांनी निर्मला यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. निर्मला यांना घरातील प्लास्टिक खुर्चीने मारहाण करण्यात आल्याने निर्मला वाजे या जखमी झाल्या. याबाबत निर्मला प्रशांत वाजे (वय ३० वर्षे रा. वाजेवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला अन्...

शिक्रापूर पोलिसांनी प्रशांत मनोहर वाजे, मनोहर शारतीलाल वाजे व किसनाबाई मनोहर वाजे (सर्व रा. वाजेवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कल्पेश राखोंडे हे करत आहे.

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news shirur taluka wajewadi women police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे