धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

मठात राहून गांजा जवळ बाळगणाऱ्या तसेच गांजा लागवड करणाऱ्या तथाकथित महाराजाच्या मठावर शिरूर पोलिसांनी छापा टाकला.

पुणे : मठात राहून गांजा जवळ बाळगणाऱ्या तसेच गांजा लागवड करणाऱ्या तथाकथित महाराजाच्या मठावर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ४१ किलो गांजा व सांबर जातीच्या प्राण्याचे शिंगे व कातडे जप्त केली आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

याप्रकरणी शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापू महाराज (वय ५३, रा. हनुमान मंदिर मठ, काठापूर खू., ता. शिरूर) असे अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठापूर खुर्द येथे हनुमान मंदिर व परिसरात गांजा जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी मठ चालवणारा महाराज शांताराम ढोबळे यांच्या मठातून तयार १० किलो गांजा व परिसरात गांजाची झाडे असा एकूण ४१ किलो ४४५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता एका गोनीमध्ये लपवून ठेवलेले सांबर जातीच्या प्राण्याचे ३ शिंगे व कातडे मिळून आले. एकूण २ लाख ५७ हजार २२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सुरेश गिते, पोलिस नाईक नितीन सुद्रिक, निलकंठ कारखेले, नाथसाहेब जगताप, बाळू भवर यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत आहेत.

पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shirur police raid on kathapur math
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे