संशयास्पद! आदित्य चोपडा याची हत्या की आत्महत्या?

आदित्य चोपडा याच्या मृत्युबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याने मृत्युच्या कारणावरून शहर व परिसरात उलट - सुलट चर्चा चालू आहे.

पुणे: शिरूर येथील युवा बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा (वय २४, रा. हुडको वसाहत, शिरूर) याचा मृतदेह बुधवारी (ता. २९) सकाळी पुणे-नगर रस्त्यावरील नारायणगव्हाण (ता. पारनेर) परिसरातील एका विहिरीत आढळून आल्याने व त्याच्या चेह-यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बापरे! तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या; पाहा शिक्षा...

आदित्यच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनूसार, आदित्य सोमवारी (ता. २७) कडूस या मूळगावी गेला होता. तेथून परतताना रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्याने कुटूंबियांशी संपर्क साधून बेलवंडी फाटा येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. रात्री आठ नंतर त्याचा मोबाईलही बंद लागल्याने त्याच्या कुटूंबियांनी व हुडको परिसरातील तरूणांनी बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण परिसरात त्याचा शोध घेतला होता. शिवाय, सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल केली होती. शोध घेत असताना नारायणगव्हाण जवळील नवले मळ्यानजीक रस्त्याकडेला त्याची दूचाकी मिळून आली. परिसरात चौकशी केली असता, तीन तरूणांशी त्याची किरकोळ हुज्जत झाली व त्यांनी त्याला त्यांच्या दूचाकीवर बसवून नेल्याची माहिती मिळाली. आदित्यच्या कुटूंबियांनी सुपे पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी तत्काळ दखल घेण्याऐवजी दुस-या दिवशी येण्यास सांगितले. मंगळवारी (ता. २८) संध्याकाळी आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान, बुधवारी त्याचा मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! पीडित मुलीचे आई-वडील शेतात गेले की अत्याचार करायचे...

दरम्यान, बुधवारी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहिरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचे त्याच्या लक्ष्यात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती जवळील नागरिकांना व सुपा पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह आदित्य चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळवण्यात आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करत अहमदनगर पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको अंदोलन केले. मृताचे नातेवाईक व जमा झालेल्या नातेवाईकामुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमच्या मुलाचा खून करून त्याला विहीरीत फेकून दिले आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शिरूरमधील युवकांनी व मृत बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी सुमारे दोन तास पुणे-नगर रस्ता रोखून धरल्याने नारायणगव्हाण परिसरात मोठा गोंधळ झाला.

हृदयद्रावक! विवाहित प्रेमीयुगलाने केला प्रेमाचा शेवट...

डीवायएसपी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, गोकावे यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर पकडल्याशिवाय मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलवू देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने मोठा गोंधळ झाला. या गोंधळातच सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गु्न्हे अन्वेशनच्या पथकामार्फत केला जाईल व दोषींची गय केली जाणार नाही, असे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

चिमुकलीला उपचारासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात...

आदित्य चोपडा याच्या मृत्युबाबत नेमकी माहिती समोर आली नसल्याने मृत्युच्या कारणावरून शहर व परिसरात उलट - सुलट चर्चा चालू आहे. बांधकाम व्यवसायातील स्पर्धेतूनच ही घटना घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पारनेर तालुक्यातील रस्त्यांची व इतर छोटी - मोठी कामे आदित्य घेत होता. ज्या नवले मळ्यातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला त्याच नवले मळ्याकडे जाणा-या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम त्याने घेतले होते. त्यातून वितुष्ट आलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा घात केला असल्याचा आरोप स्थानिक तरूणांनी केला. या प्रकरणी सुपे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे पोलिस निरीक्षक गोकावे यांनी सांगितले.

धमकी! नोकरी द्या अथवा पन्नास लाख रुपये द्या...

सुपा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात रवाना केला. उशीरा पर्यत गुन्हा नोंदवन्याचे काम चालू होते. शवविच्छेदनाचा अहवाल हातील आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. व्यवसायाने ठेकेदार आसलेल्या आदित्य चोपडाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळवळ उडाली आहे. हत्या की आत्महत्या? अशा दोनही बाजूने पोलिस तपास करत आहेत.

पुण्यामध्ये युवकाला बेदम मारहाण करून सातारला पळून गेले; पण...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shirur aaditya chopda body found at
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे