बापरे! पोलिसांना टेंम्पोच्या आत पाहिल्यावर बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात कत्तलीला चाललेल्या तीन बैलांना जीवदान...

सदर रस्त्याने एम एच १४ ए एस ६३८८ क्रमांकाचा पिकअप आल्याचे दिसून आले. यावेळी पीकअप थांबवून त्यामध्ये पाहणी केली असता धक्काच बसला.

पुणे: सणसवाडी (ता. शिरूर) येथून कत्तलीला जाणाऱ्या मोठ्या तीन बैलांना जीवदान देत बैलांना गोशाळेत रवाना करत जनावरांची वाहतूक करणाऱ्या चालक व वाहकाला अटक केली. पिकअप जप्त करण्यात आला असून, जनावरे विक्री करणाऱ्यांसह वाहतूक करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संरपंचांची ऑनलाईन फसणूक करणारा ठकबाज ताब्यात...

सणसवाडी येथील पुणे-नगर महामार्गावरुन काही जनावरे बकरी ईदच्या कुर्बानीचे कत्तलीसाठी साठी जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली होती. त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती देत शिक्रापूर नजिक रस्त्याचे कडेला सापळा लावला. त्यांना सदर रस्त्याने एम एच १४ ए एस ६३८८ क्रमांकाचा पिकअप आल्याचे दिसून आले. यावेळी पीकअप थांबवून त्यामध्ये पाहणी केली असता दाटीवाटीने अतिशय क्रूरपणे मोठी जनावरे बांधल्याची तसेच जनावरांना जखमा झाल्याचे दिसून आले.

'... या जीवनाला काही अर्थ नाही'

दरम्यान, पिकअप चालकाडे जनावरांच्या पावत्या बाबत चौकशी केली असता त्यांना ही जनावरे मक्सूद कुरेशी व किरण इंद्रेकर यांनी पेरणे फाटा येथून भरून देऊन श्रीगोंदा येथे कत्तलीसाठी घेऊन जाण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनतर मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, प्राणीमित्र शेरखान शेख, शुभम वाघ, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलिस हवालदार किशोर तेलंग, पोलिस नाईक मिलिंद देवरे, भास्कर बुधवंत, अंबादास थोरे यांसह पोलिसांनी सदर पिकअप जप्त करत सर्व जनावरांना लोणीकंद येथील गोशाळेत रवाना केले.

प्रियकराने प्रेयसीचे घर गाठल्यानंतर उचलले धक्कादायक पाऊल...

याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (रा. शिवाजीनगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सागर सुधाकर कसबे, महिंद्रा रवींद्र इंद्रेकर (दोघे रा. वाघमारे वस्ती पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे), मक्सूद कुरेशी व किरण इंद्रेकर (पूर्ण नाव पत्ते माहीत नाही) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश करपे हे करत आहे.

पुण्यात अजित पवारांच्या 'कडक' सुचना; पाहा काय सुरू, काय बंद...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shikrapur police save three bull li
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे