धक्कादायक! टेम्पोमधून कत्तलीसाठी किती जणावरे चालवली होती पाहा...

शिरूर तालुक्यातून कत्तलीला चाललेल्या चौदा गोमातेंना जीवदान

टेम्पो मध्ये जनावरे दाटीवाटीने अतिशय क्रूरपणे बांधल्याची तसेच जनावरांना जखमा झाल्याचे दिसून आले.

पुणे: सणसवाडी (ता. शिरुर) येथून कत्तलीसाठी चाललेल्या तीन बैलांना जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच आता चाकण-शिक्रापूर रस्त्याने बकरी ईद च्या कुर्बानीच्या कत्तलीसाठी चाललेल्या तब्बल चौदा गायांना जीवदान मिळाले आहे. सर्व गायांना गोशाळेत रवाना करत जनावरांची वाहतूक करणाऱ्या चालकासह दोघांवर गुन्हे दाखल करत टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; निर्बंधाबाबत घ्या जाणून...

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील चाकण-शिक्रापूर रस्त्याने एम एच ०६ जि ७०४० टेम्पो मधून १५ जुलै रोजी काही जनावरे बकरी ईद च्या कुर्बानीचे कत्तलीसाठी रोहकल येथील रफिक काझी यांच्या येथून जाणार असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली होती. त्यानंतर शिवशंकर स्वामी, प्रतीक भेगडे, निलेश चासकर यांनी चाकण-शिक्रापूर रस्त्याने येत पाहणी केली असता त्यांना सदर जनावरे घेऊन जाणारा टेम्पो दिसला. त्यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देत पोलिसांची मदत बोलावून घेतली. मात्र, यावेळी आपल्या मागावर काही नागरिक असल्याचा संशय जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाला आल्याने त्याने पिंपळे जगताप येथून पुन्हा टेम्पो चाकण बाजूकडे वळविला. दरम्यान, चालक टेम्पो सोडून पळून गेला. 

युवतीने रात्रीच्या सुमारास उचलले धक्कादायक पाऊल...

यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे, पोलिस शिपाई मयूर कुंभार यांनी त्या ठिकाणी जात टेम्पो मध्ये पाहणी केली असता टेम्पो मध्ये तब्बल चौदा जनावरे दाटीवाटीने अतिशय क्रूरपणे बांधल्याची तसेच जनावरांना जखमा झाल्याचे दिसून आले. यावेळी पोलिस तसेच गोरक्षकानी सर्व जनावरे लोणीकंद येथील गोशाळेत रवाना केली.

'यमभाई' म्हणतो; आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात...'

याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (रा. शिवाजीनगर पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी जनावरे भरुन देणारा रफिक शगिर काझी (रा. चाकण ता. खेड जि. पुणे) तसेच टेम्पो चालक तसेच जनावरे खरेदी करणारा व्यक्ती (पूर्ण नाव पत्ते माहीत नाही) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप कारंडे हे करत आहेत.

खळबळजनक! कोहळ्याला टाचणी टोचून लावला मुलीचा फोटो...

धक्कादायक! महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थिनीकडे केली शरीर सुखाची मागणी

बापरे! नवऱयाला पत्नीसह मैत्रिणी पाहून फुटला घाम...

चर्चेत! हेमांगी कवी लाटत होती पोळ्या, ट्रोलर्सची नजर नको तिथे...

प्राध्यापकाने 'बाय बाय डिप्रेशन', 'सॉरी गुड्डी' असे फेसबुकवर लिहिले अन्..

महिला डॉक्टरच्या बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावणाऱया प्रतिष्ठीत डॉक्टरला अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shikrapur police save cow life temp
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे