घरी परतल्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर बसला धक्का; शिवाय...

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ गरुड हे करत आहेत.

पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर मधील एक व्यक्ती कामाला गेलेला असताना अज्ञात चोरट्यांनी सदर व्यक्तीच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील काही रक्कम तसेच घरातून चावी मिळाल्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञातावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरुर तालुक्यात पत्रकाराला अरेरावी: युवकावर गुन्हा दाखल

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर मध्ये राहणारे स्वरूप सामंता यांनी त्यांची दुचाकी घराबाहेर लावून ठेवली होती. दुचाकीची चावी घरात ठेवलेली होती. सामंता हे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावरून घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे तसेच काही रक्कम आणि दुचाकीची चावी चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी बाहेर पाहणी केली असता त्यांची एम एच १२ आर यु २५७४ हि दुचाकी देखील चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

याबाबत स्वरूप तारीनी सामंता (वय ३२ वर्षे रा. करंजेनगर शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. टोकीपूर निमडानगी ता. देवूळपुरा जि. हुगली वेस्ट बंगाल)  यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ गरुड हे करत आहेत.

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

पुणे पोलिस आयुक्तांकडून आणखी एका टोळीविरुद्धा मोक्का

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news shikrapur police register complatin
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे