पोलिसांना पाहाताच सुरू झाली एकच पळापळ; पण...

शिरूर तालुक्यातील एका घरामध्ये पोलिसांनी टाकला छापा अन्...

एकाच्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती.

पुणे: पाबळ (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहाताच एकच पळापळ सुरू झाली. पोलिसांनी या कारवाईत बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, योगेश शामकांत शिंदे, शामकांत दगडी शिंदे व दत्तात्रय बाजीराव जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात लघुशंका करताना बसला वीजेच्या धक्का अन्...

पाबळ येथील एकाच्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. त्यांनतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस नाईक अमोल दांडगे, सागर कोंढाळकर, विकास पाटील, जयदिप देवकर, लक्षमण शिरसकर, किशोर शिवणकर यांसह आदींनी सदर ठिकाणी जात छापा टाकला.

राज कुंद्राच्या गुन्हेगारी प्रकरणांची पाहा यादी...

सदर ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने यावेळी त्यांना ताब्यात घेत तेथील पस्तीस हजार रुपये तसेच आदी साहित्य असा बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. योगेश शामकांत शिंदे, शामकांत दगडी शिंदे व दत्तात्रय बाजीराव जाधव (सर्व रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shikrapur police raid on pabal and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे