महेश जगताप माहित आहे का? आम्ही त्याची माणसे आहोत...

महेश जगताप माहित आहे का? आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडतीन लाख रुपये द्यायचे.

पुणेः सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी घेतली होती. गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेश जगताप याला जेरबंद करण्यात अखेर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ठेकेदार फुलसिंग यादव हे चार मे २०२२ रोजी कंपनीतून रात्रीच्या सुमारास घरी जात असताना काही युवकांनी त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. महेश जगताप माहित आहे का? आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडतीन लाख रुपये द्यायचे नाहीतर मारून टाकण्याची तसेच हत्याराने खून करण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेतली होती. 

याबाबत फुलसिंग रेवती यादव (वय ४७ वर्षे रा. श्रीरामनगर चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. कुटखेडा ता. बयाना जि. भरतपूर राजस्थान) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील काही आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. मात्र, मुख्य आरोपी महेश जगताप चार महिने उलटून देखील फरार होता. अनेकदा तो राजकीय नेत्यांच्या सानिध्यात गेल्याबाबतचे काही फोटो देखील प्रसारित झाल्याने काही वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे महेश जगतापला अटक करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. 

महेश जगताप पिंपळे जगताप येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली त्यांनतर पोलिस नाईक शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, जयदीप देवकर, विकास पाटील, लखन शिरसकर, निखील रावडे यांनी साध्या वेशात पिंपळे जगताप येथे सापळा रचला. महेश जगताप आल्याचे दिसून आले त्यावेळी पोलिसांनी शिताफीने महेश जगताप (रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) याला ताब्यात घेत जेरबंद केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे व पोलिस नाईक रोहिदास पारखे करत आहेत.

शिक्रापुरात मैत्रिणीला भेटायला गेलेल्या महिलेचा विनयभंग...

राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलिस अधिकाऱयाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune district crime news shikrapur police arrest mahesh jagt
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे