औषध बनविणाऱ्या कंपनीलाच घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा...

सदर वेबसाईट वरुन संपर्क क्रमांक मिळवून त्याच्यावर संपर्क करत पन्नास किलो पावडर मागितली.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे  प्रतिमा फार्म स्युटिकलं या औषध बनविणाऱ्या कंपनीने औषध बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मागवला असताना गुजरात येथील एका कंपनीने दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपये ऑनलाईन घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे रणजित सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात काय चाललंय ! कुणीही उठून स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू करतोय...

शिक्रापूर येथे डॉ. संदीप क्षीरसागर यांची प्रतिमा फार्म स्युटिकलं ही औषध बनविणारी कंपनी असून, त्यांना औषध बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून लागणारी पावडर ही ते नेट वरून शोधत होते. त्यांना गुजरात येथील रिअल फ्रंटलाईन फार्म स्युटिकलं या कंपनीकडे सदर कच्चा माल म्हणून लागणारी पावडर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी सदर वेबसाईट वरुन संपर्क क्रमांक मिळवून त्याच्यावर संपर्क करत पन्नास किलो पावडर मागितली. सदर कंपनीच्या वतीने रणजित सिंग यांनी डॉ. संदीप क्षीरसागर यांना पावडर चे निम्मे बिल स्वरूपात दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा...

क्षीरसागर यांनी सदर रक्कम भरली. मात्र, त्यांनतर मागविलेली कच्चा मालाची पावडर शिक्रापूर येथील कंपनीत येत नसल्याने डॉ. क्षीरसागर यांनी वेळोवेळी गुजरात येथील रिअल फ्रंटलाईन फार्म स्युटिकलं या कंपनीला संपर्क केला. संपर्क झाला नाही तसेच नंतर त्या कंपनीकडे संपर्क झाला नाही. त्यानंतर क्षीरसागर यांना फोनवर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत शिक्रापूर येथील प्रतिमा फार्म स्युटिकलं कंपनीचे संचालक डॉ. संदीप शरद क्षीरसागर (वय ४० वर्षे रा. युनिक रेसिडेन्सी भावडी रोड वाघोली ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरणी मोठी कारवाई...

शिक्रापूर पोलिसांनी गुजरात येथील रिअल फ्रंटलाईन फार्म स्युटिकलं या कंपनीचे संचालक रणजित सिंग (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरुध्द फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश माने हे करत आहेत.

मुंबई पोलिसांची गणेशोत्सवासाठी नियमावली; घ्या जाणून...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shikrapur medicine company online
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे