शिरूर तालुक्यातील बेपत्ता चौघांचे मृतदेह रायगड मध्ये आढळल्याने खळबळ
मुलांचा खून करून दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज
शिक्रापूर येथून पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रायगड येथे रवाना झाले आहे.पुणेः शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीमधून बेपत्ता झालेल्या चोघांचे मृतदेह रायगड मधील एका हॉटेल मध्ये आढळून आले असल्याने पुणे सह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून, मुलांचा खून करून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
एसटीमध्ये बसल्यावर खिडकीमधून हळूच हात आतमध्ये घातला अन्...
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीतून जातेगाव बुद्रुक येथून कुणाल चिंतामण गायकवाड (वय २९) हा २ मे २०२२ रोजी बेपत्ता झाला होता. त्यांची पत्नी सपना कुणाल गायकवाड (वय २७ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली होती. शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरातून प्रियांका संदीप इंगळे (वय २५) हि महिला तिचे दोन मुले भक्ती संदीप इंगळे (वय ५) व माऊली संदीप इंगळे (वय ३) या दोन मुलांसह सदर महिला बेपत्ता झाली होती. याबाबत बेपत्ता महिलेचा पती संदीप आशाराम इंगळे (वय ३४ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली होती. मात्र, सदर बाबत पोलिस स्टेशन येथे खबर दाखल असताना आज (मंगळवार) सायंकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील एका हॉटेल मध्ये चोघांचे मृतदेह आढळून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा पदाधिकारी बलात्कारानंतर झाला फरार...
दरम्यान, रायगड पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करत पाहणी केली असता येथे भक्ती संदीप इंगळे व माऊली संदीप इंगळे यांचे मृतदेह खाली पडल्याचे तसेच कुणाल चिंतामण गायकवाड, प्रियांका संदीप इंगळे या दोघांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी मात्र दोघांनी मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सदर घटनेबाबत नेमके कारण काय व कसे घडले याबाबत सध्या तरी तर्क वितर्क बोलले जात आहे तर शिक्रापूर येथून पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रायगड येथे रवाना झाले आहे.
नराधाम बाप रात्री दाऊ पिऊन घरी आला अन् काय केले पाहा...
शिरुर तालुक्यात मायलेकींवर काळाचा घाला
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...