संरपंचांची ऑनलाईन फसणूक करणारा ठकबाज ताब्यात...

सी एस आर फंडाचे आमिष दाखवून शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांची आर्थिक फसवणूक करणारा ठकबाजाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.

पुणेः सी एस आर फंडाचे आमिष दाखवून शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांची आर्थिक फसवणूक करणारा ठकबाजाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.

'... यी जीवनाला काही अर्थ नाही'

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील आंबळे गावाचे सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे (ता. शिरूर जि. पुणे) यांना ९ जुलै रोजी त्यांचे मोबाईल नंबर वर अनोळखी व्यक्तीचा फोन येऊन त्याने आपले नाव अनिरुद्ध टेमकर असे सांगितले. शिवाय, मी इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीचा सी.एस.आर कन्सल्टंट बोलत असल्याचे सांगितले. इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीकडून सी.एस.आर फंड गावाकरिता देणार असून, त्याकरिता गावचा कोड ओपन करण्यासाठी त्यांचे बँक ऑफ बडोदा या बँकेच्या खात्यावर दहा हजार रुपये फोन पेच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल नंबर 90 11 43 98 81 वर पाठविण्यास सांगितले. त्यापैकी नऊ हजार पाचशे रुपये चोवीस तासात रिफंड होतील, असेही सांगितले.

प्रियकराने प्रेयसीचे घर गाठल्यानंतर उचलले धक्कादायक पाऊल...

सरपंच सोमनाथ बेंद्रे यांचे व्हाट्सअप वर गावाकरिता सी.एस.आर मधून कोण कोणते काम केले जाणार याची माहिती पाठवली. कामाचे स्वरूप व गावाच्या विकासाकरिता सोमनाथ बेंद्रे यांनी दहा हजार रुपये फोन पे केले होते. परंतु, 24 तासात नऊ हजार पाचशे रुपये रिफंड झाले नाहीत. व अनिरुद्ध टेमकर यांना संपर्क केला असता त्याचे फोनवरील बोलणे त्यांना समाधानकारक वाटले नाही. त्यादरम्यान शिरूर तालुक्यातील आंबळे गावाजवळील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस या गावातील सरपंचाची देखील अशा प्रकारे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. सोमनाथ बेंद्रे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे दहा जुलै रोजी फिर्याद दाखल केली.

पुण्यात अजित पवारांच्या 'कडक' सुचना; पाहा काय सुरू, काय बंद...

घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सूचना करून बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यात सांगितले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलिस हवालदार सचिन गायकवाड पोलिस नाईक अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांचे तपास पथक नेमण्यात आले होते.

पुणे शहरातील युवतीची लाखो रुपयांची फसवणूक; कशी ती पाहा...

दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अनिरुद्ध टेमकर याची माहिती प्राप्त करून घेत सदर चा आरोपी हा (कान्होबा वाडी ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील राहणारा असून, तो आज रोजी औरंगाबाद येथून मुंबईला जाणार असले बाबत गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नेमलेल्या तपास पथकाला योग्य माहिती व सूचना देऊन औरंगाबाद-पुणे महामार्गावर आरोपीचा शोध घेण्या बाबत कळविले. त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना तपास पथक हे कोंढापुरी परिसरात हायवेवर आरोपीचा शोध घेत होते. हायवे रोडवर असताना आरोपी हा शिक्रापूर-चाकण रोडने मुंबईकडे निघाला असल्याची माहिती प्राप्त झाली. अनिरुद्ध बाबासाहेब टेमकर (वय 32 रा. कान्होबा वाडी गंगापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

धक्कादायक! महिला डॉक्टरच्या बेडरुममध्ये सापडला स्पाय कॅमेरा...

शिरूर तालुक्यातील आंधळगाव, शिरसगाव काटा, गणेगाव दुमाला, कोळगाव डोळस व इतर ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसआर फंडाचे आम्ही दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला शिरूर पोलिस स्टेशन येथे यांचे ताब्यात देण्यात आले असून, अशा प्रकारे आणखी काही ग्रामपंचायतीची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधण्याबाबत पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news sarpanch online fraud lcb 1 arreste
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे