चोरट्यांनी मध्यरात्री बेडरूमच्या कड्या लावल्या अन्...

घरातील आतील दोन्ही बेडरूमला बाहेरून कड्या लावल्या. घरात झोपलेल्या गायकवाड यांची आजी लताबाई यांचे तोंड दाबून धरले.

पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात प्रवेश करून घराच्या आतील खोल्यांच्या कड्या बाहेरून लावल्या. ज्येष्ठ महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

शिक्रापूर येथील करंजेनगर येथील आकाश गायकवाड व त्यांचे वडील दिलीप गायकवाड हे रात्रीच्या सुमारास घरातील बेडरूम मध्ये झोपले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारात चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील आतील दोन्ही बेडरूमला बाहेरून कड्या लावल्या. घरात झोपलेल्या गायकवाड यांची आजी लताबाई यांचे तोंड दाबून धरून आजीला हातोडीने मारण्याची धमकी दिली. आजीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला. 

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

दरम्यान, भयभीत झालेल्या आजीने आरडाओरडा केल्याने आकाश गायकवाड हे उठले. मात्र, बाहेरून कड्या असल्याने त्यांनी दरवाजा तोडून बाहेरील खोलीत आले असताना भयभीत झालेल्या आजीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याबाबत आकाश दिलीप गायकवाड (वय २६, रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चार जणांवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहेत.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

धक्कादायक! पुण्यातील सामूहिक बलात्काराबाबत नवी माहिती समोर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news robbery at shikrapur police station
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे