मारायचे होते मुलाला, खून केला वडिलांचा; आठ तासात अटक...

आरोपीने कसलाच पुरावा पाठीमागे ठेवलेला नसताना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे: शिरुर तालुक्यातील एका गावातील माजी उपसरपंचाचा खून करण्याबाबत फोनवर झालेले संभाषण रेकॉर्डिंग करुन संबंधित उपसरपंच आणि इतरांना पाठविल्याचा राग मनात धरुन आरोपी हा संबंधित युवकाला मारण्यासाठी रात्रीच्या वेळेस त्याच्या घरी गेला. घराच्या ओट्यावर तो युवक झोपलाय असे समजून त्याने धारदार हत्याराने संबंधित युवकाच्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने कसलाच पुरावा पाठीमागे ठेवलेला नसताना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

खळबळ! शिरूर तालुक्यात ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीचा खून...

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळसर खुर्द येथे गुरुवारी (ता. ५) रात्री ९ च्या सुमारास जालिंदर सुदाम ढेरे (वय ५०) हे त्यांच्या  घरासमोरील ओट्यावर झोपले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या छातीवर, गळ्यावर, हातावर व पाठीवर धारदार हत्याराने वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. सदर बाबत मयत जालिंदर ढेरे यांची पत्नी अर्चना जालिंदर ढेरे यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा पाठीमागे ठेवलेला नसल्याने पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

सदर गुन्हयातील आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा ठेवलेला नसताना व आरोपी बाबत निश्चित अशी कोणतीही ठोस माहिती नसतांना सदरचा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळास तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी आणि पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी पोलिस स्टाफसह भेट दिली. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सुचनांप्रमाणे घटनास्थळास स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी त्यांच्या तपास पथकासह भेट देवून माहिती संकलित करुन गुन्हा उघडिकस आणण्याचे प्रयत्न सुरु केले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन कडील तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार वैभव मोरे, पोलिस कॉन्सटेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी रात्रभर बाभुळसर व कर्डे परिसरात ठाण मांडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आज  (शुक्रवार) सकाळी ७ च्या सुमारास गुन्हयातील निष्पन्न आरोपी निखिल सतिष थेऊरकर (वय १९, रा. कर्डे, ता. शिरुर, जि. पुणे) यास ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखविताच त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केला. 

शेजाऱयांनी रस्त्यातच केलेली मारहाण सहनच झाली नाही; मग...

गुन्हयातील मयताचा मुलगा उत्कर्ष जालिंदर ढेरे व आरोपी निखील थेऊरकर यांच्यामध्ये काही दिवसापुर्वी करडे येथील माजी उपसरपंच गणेश रोडे यांचा खून करण्याबाबत फोनवर संभाषण झाले होते. ते संभाषण उत्कर्ष ढेरे याने रेकॉर्डींग करुन गणेश रोडे व इतरांना पाठविल्याच्या कारणावरुन उत्कर्ष ढेरे व निखिल थेऊरकर यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे निखील थेऊरकर हा उत्कर्ष ढेरे याला मारण्याच्या तयारीमध्ये सोबत धारदार कोयता घेवून उत्कर्ष ढेरे याच्या घरी आला होता. त्यावेळी उत्कर्ष ढेरे हाच घरासमोर अंधारामध्ये झोपलेला आहे असे समजून आरोपी निखील थेऊरकर याने उत्कर्षचे वडील जालिंदर सुदाम ढेरे यांच्यावर त्याच्याकडील कोयत्याने वार करुन त्यांस गंभीर जखमी करुन खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयातील आरोपी निखिल सतिष थेऊरकर याला अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरुर यांच्यासमोर हजर केले असता आरोपीस गुरुवारपर्यंत (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला पण सापडलेच...

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने, वैभव मोरे, वैज्जनाथ नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस नाईक माऊली शिंदे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे करत आहेत.

दहशतवाद्यांना घातपाताचा कट फसला; महाराष्ट्र कनेक्शन समोर...

दबंग! महिला पोलिस अधिकाऱयाने होणाऱ्या पतीला केली अटक

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज खोटा; फॉरवर्ड नका करू...

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news ranjangaon midc police arreste for
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे