एक बार तुझे बोल दिया, तुझे समज में नहीं आया क्या...?

कंपनीच्या भंगारच्या ठेक्यासाठी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

"तुम कंपनीमें स्क्रॅप का टेंडर नहीं भरणे का, एक बार तुझे बोल दिया, तुझे समज में नहीं आया क्या...? तेरी लाश पता भी लगने नही दूंगा"

पुणे: रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीचे भंगार उचलण्याचे टेंडर आपल्यालाच मिळावे या उद्देशाने पाच ते सहा जणांनी कारेगाव येथील गजबजलेल्या यश इन चौकातील गंगा ग्रँड हॉटेल समोरच एका व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्याने सदर मारहाण करणारे आरोपी पळून गेले. याबाबत महंम्मद रियाज उद्दीन फकर उद्दीन (वय ५०) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रांजणगाव औदयोगिक वसाहतीतील व्हर्लपूल कंपनीत भंगार स्क्रॅपचे टेंडर असून, त्याची मुदत ३० जून रोजी संपत आहे. बुधवारी (ता. २२) फिर्यादींचा मुलगा आणि भाऊ असे तिघेजण हे स्क्रॅपचे नवीन ऑनलाईन टेंडर भरण्यासाठी आले होते. त्यावेळी यश इन चौकातील गंगा ग्रँड हॉटेल मध्ये कॉफी पिऊन हे तिघेजण हॉटेलच्या समोर उभे असताना एम एच ०२ एफ एम २२४२ या चारचाकी गाडीतून मुस्ताक शफी अहमद आणि सिद्धिक शफी अहमद हे दोघे उतरुन महंम्मद रियाज उद्दीन यांच्या जवळ आले त्यापैकी मुस्ताक अहंमद याने फिर्यादीस "तुम कंपनीमें स्क्रॅप का टेंडर नहीं भरणे का, एक बार तुझे बोल दिया, तुझे समज में नहीं आया क्या...? तेरी लाश पता भी लगने नही दूंगा" असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.  

शिरुर तालुक्यात LG कंपनीच्या नावाखाली ९ जणांची फसवणुक

दुसऱ्या चारचाकी गाडी क्रं एम एच १२ टि ६०७८  या गाडीतून अकील अहंमद, अमीर शेख, काशेफ तसेच पंडित देवकर हे खाली उतरले आणि फिर्यादीस "मुस्ताक की बात मान जा, नही  तो जान से हाथ धो बैठेगा" असे म्हणत या सर्वांनी फिर्यादीस मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवले आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि चुलत भाऊ यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने आजुबाजुला जमलेल्या लोकांनी फिर्यादीस त्या सहा जणांच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर हे सहा आरोपी दोन गाड्यांमध्ये बसून पळून गेले. त्यानंतर फिर्यादीने तात्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

बिहारमधील ८० जणांना रांजणगाव MIDC कंपनीचे दिले 'जॉईनिंग लेटर' पण...

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुस्ताक शफी अहमद, सिद्धिक शफी अहमद, अकील अहंमद, अमीर शेख, काशेफ (सर्व मुळ रा. औरंगाबाद, सैदा कॉलनी, सेंटर जेल जवळ, ता. जि. औरंगाबाद, सध्या रा. यश इन चौक, कारेगाव) तसेच पंडित देवकर (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) या सहा जणांवर अपहरण करण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे, सुरज वळेकर, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी तात्काळ हालचाल करत एका आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.

स्वारगेटजवळ मध्यरात्री मोटारीत दोन वेळा बलात्कार; दोन तासात अटक...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news ranjangaon midc police area one kid
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे