रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

दोन पोलिस किरकोळ जखमी, एका ट्रकचालकाला बेदम मारहाण

रांजणगाव एमआयडीसी येथे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास प्रमोद हा ट्रकचे केबिनमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी ट्रकची काच फोडली.

पुणेः रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. ११) रोजी रात्रीच्या सुमारास पोलिस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालत असताना काही युवक येथील पुणे-नगर महामार्गावर लोखंडी हत्यारे घेऊन थांबल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी जात त्यांना पकडण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी पोलिसांशी झटापट करून पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पोलिस नाईक राजू वाघमोडे किरकोळ जखमी झाले आहेत.

अभिमानास्पद! पोलिस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू गायकवाड, पोलिस हवालदार विजय सरजिने, पोलिस नाईक पांडुरंग साबळे, राजू वाघमोडे हे गस्त घालत होते. येथील जुना टोलनाका येथे तीन चार व्यक्ती हातामध्ये लोखडी रॉड घेवून आंधारामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर पोलिस त्याठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना चार जण हातामध्ये लोखंडी रॉड, टॉमी घेवून अंधारामध्ये थांबल्याचे दिसले. दरम्यान, सदर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता यावेळी पोलिस व चोरट्यांची समोरासमोर झटापट झाली. तेव्हा तेथील एकाने पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पोलिस नाईक राजू वाघमोडे यांचे हातावर लोखंडी रॉडने मारुन त्यांना जखमी केले. उर्वरीत पळून जाऊ लागले असताना त्यापैकी एकास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू, कात्री, छोटी बॅटरी व एक लोखंडी टॉमी मिळून आली. त्याचे नाव रमेश भिमा पवार (वय ३० वर्षे, रा. लिंगनौर ता. मिरज जि. सांगली) असे आहे. त्याचे इतर तीन साथीदार पळून गेले आहेत. दरम्यान, सदर आरोपीं विरुद्ध पोलिस नाईक राजू वाघमोडे यांनी फिर्याद दिल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चौघांवर शासकीय कामात अडथळा आणून धक्काबुक्की व मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चो-या करणारी टोळी जेरबंद

दरम्यान, शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटल येथून रात्री उशिरा पोलिस स्टेशनला फोन आला कि प्रमोद बजरंगी चव्हाण (वय ३० वर्षे रा. अथरवली ता. रसडा जि. बलिया उत्तर प्रदेश) याला रांजणगाव एमआयडीसी येथे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास प्रमोद हा ट्रकचे केबिनमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी ट्रकची काच फोडून झोपलेल्यांना चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांचेकडील दोन मोबाईल व  रोख जबरदस्तीने चोरून नेले. मात्र, यावेळी प्रमोद याने मोबाईलचा पासवर्ड न सांगितल्याने चोरट्यांनी लोखंडी टॉमीने प्रमोद चव्हाण याच्या डोक्यात जोरात फटका मारुन गंभीर जखमी केले. यावेळी पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, वैभव मोरे, विजय शिंदे यांनी तातडीने सदर हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली असता सदर जखमी व्यक्ती व त्याचा साथीदार तेजबहादुर पटेल असे एल.जी. कंपणी समोरील जागेत एम एच १२ एन एक्स ८८९० या ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेले असतांना चोरट्यांनी सदर प्रकार केल्याचे समोर आले.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रमेश गिमा पवार व त्याच्या साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींनी इतर ठिकाणी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे व पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे हे करत आहेत.

इंजिनिअरकडून रागाच्या भरात घडली मोठी घटना...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news ranjangaon midc police and gangster
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे