जावयाने वीट घातली सासूच्या डोक्यात; कारण पाहा...

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमरदिन चमनशेख हे करत आहेत.

पुणे: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे जावयाने सासूकडे पैसे मागितले असता सासूने पैसे न दिल्याने जावयाकडून सासूला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे प्रसाद किरण भोसले या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब नव्हे तर काय आढळले पाहा...

करंदी (ता. शिरुर) येथील प्रसाद भोसले व त्याची पत्नी अंजली भोसले यांचे वाद झाले असल्याने अंजलीची आई बायडाबाई भोयटे व वडील पांडुरंग भोयटे हे अंजलीचा पती असलेल्या प्रसाद याला त्याचे वॉशिंग सेंटर असलेल्या पिंपळे जगताप चौफुला येथे जाब विचारण्यासाठी गेले होते. प्रसाद याने सासूकडे पैसे मागितले. दरम्यान, सासूने पैसे न दिल्याने प्रसाद याने सासूला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन वीट डोक्यात मारून जखमी केले.

रूबी हॉल क्लिनिक किडनी तस्करी प्रकरणात मोठी कारवाई

याबाबत बायडाबाई पांडुरंग भोयटे (वय ४० वर्षे रा. पिंपळे जगताप चौफुला ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी प्रसाद किरण भोसले (रा. गणपती माळ करंदी ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमरदिन चमनशेख हे करत आहेत.

राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news mother in law beaten at shirur talu
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे