पिकअपचा दरवाजा उघडा दिसला अन् धक्काच बसला...

हॉटेलमध्ये दुध देऊन पुन्हा पिकअप जवळ आले असता त्यांना पिकअपचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आला.

पुणे: कासारी फाटा (ता. शिरूर) येथे हॉटेलला दुध देण्यासाठी गेलेल्या दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याचे पिकअप मधून पंचावन्न हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

कासारी फाटा परिसरातील हॉटेल ला दुध पुरविणारे दुग्ध व्यावसायिक शेतकरी अर्जुन थोरात हे शुक्रवारी (ता. १९) सकाळच्या सुमारास हॉटेलला दुध देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या जवळील पंचावन्न हजार रुपये रक्कम असलेल्या पैशाची पिशवी पिकअपच्या शीट खाली ठेवली होती. काही वेळाने थोरात हे हॉटेलमध्ये दुध देऊन पुन्हा पिकअप जवळ आले असता त्यांना पिकअपचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आला. त्यामुळे त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता पिकअप मधील पैशाची पिशवी दिसली नाही. त्यामुळे पैशाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

याबाबत अर्जुन धोंडीबा थोरात (वय ४४ वर्षे रा. दत्तविहार शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्रीमंत होनमाने हे करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news money robbery at kasari phata shikr
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे