मोबाईल टाँवरच्या बँटऱया चोरणा-या टोळीचा पर्दाफाश...

आरोपींकडून गुन्हयात वापरलेला चारचाकी टेम्पो नं MH12SF8205 किं रु 5,00,000 चा जप्त करण्यात आला असून, पाचही आरोपींना शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणेः शिरूर तालुक्यातील मोबाईल टाँवरच्या बँटरी चोरणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी शिरूर तालुक्यातील तिघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बनावट मार्कलिस्ट तयार करणाऱया टोळीला एलसीबीकडून बेड्या

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यामध्ये विविध कंपनीच्या मोबाईल टाँवर च्या बँटरी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कारवाई करणे बाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांना सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शिक्रापूर परिसरात पहाटेच्या वेळी गस्त करीत असताना, पो ना योगेश नागरगोजे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा उदय बाळासाहेब काळे (रा. तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांनी त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केला आहे.  

पुणे शहरात आयपीएलच्या सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा...

खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उदय बाळासाहेब काळे (रा. तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार 1) प्रवीण रमेश मांढरे (वय 30 वर्षे, रा.  शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे), 2) अक्षय अशोक शेलार (वय 26 वर्षे, रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे), 3) अक्षय बाळासाहेब वांभुरे (वय 28 वर्षे, रा. वाडा गावठाण ता. शिरूर जि. पुणे) यांचे मदतीने केल्याची कबुली दिली. सदर आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशी मध्ये त्यांनी शिक्रापूर पोस्टे गु र नं 774 /19 भादवि कलम 379 हा गुन्हा देखील केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच वर नमूद आरोपींनी दोन्ही गुन्ह्यातील एकुण 30 बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली असून, चोरलेल्या बॅटऱ्या त्यांनी  राजकुमार महादेव यादव टिळेकर नगर सर्वे नंबर 52 कोंढवा बुद्रुक पुणे यास विकल्याचे सांगितले. गुन्हा करते वेळी त्यांनी राजकुमार यादव याचे अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन MH12SF 8205  हे बँटरी चोरी करण्यासाठी वापरल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडून गुन्हयात वापरलेला चारचाकी टेम्पो नं MH12SF8205 किं रु 5,00,000 चा  जप्त करण्यात आला असून, पाचही आरोपींना शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बापरे! गुप्तधनासाठी पत्नीचाच देणार होते नरबळी; तेवढ्यात...

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहा. पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहा फौजदार पंदारे, पोहवा जनार्दन शेळके, पो.हवा. अजित भुजबळ, पो.हवा. राजू मोमीन, पो.हवा सचिन घाडगे, पो.ना. मंगेश थिगळे, पो. ना. योगेश नागरगोजे, स फौ मुकुंद कदम, पो शि अक्षय जावळे यांनी केली.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news mobile tower battery thief arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे