पुणे जिल्ह्यातील दोन गावांमधून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी...

मोबाईल टॉवरच्या तब्बल वीस बॅटऱ्या चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहेत.

पुणे: सणसवाडी (ता. शिरुर) सह पिंपळे जगताप येथील दोन्ही ठिकाणच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या एकाच दिवशी चोरीला जाण्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

'लखोबा लोखंडे'चा प्रताप ऐकून पोलिसही झाले हैराण...

सणसवाडी व पिंपळे जगताप येथे इंडस कंपनीचे मोबाईल टॉवरच्या आहेत. सदर टॉवरची देखभाल करण्यासाठी काही कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. २२ सप्टेंबर रोजी पहाटे अचानकपणे सणसवाडी येथील टॉवर बंद पडला. त्यामुळे सदर कंपनीचे फिल्ड ऑफिसर युवराज वानखेडे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता सणसवाडी येथील टॉवरच्या ठिकाणी असलेल्या दहा बॅटऱ्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याच वेळी पिंपळे जगताप येथील देखील टॉवर बंद पडल्या असल्याची माहिती मिळाली. श्री. वानखेडे यांनी त्या ठिकाणी देखील जात पाहणी केली असता तेथील देखील टॉवरच्या दहा बॅटऱ्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

धक्कादायक! घरातून बाहेर पडलेल्या युवतीचा आढळला मृतदेह...

दरम्यान, सणसवाडी व पिंपळे जगताप येथील मोबाईल टॉवरच्या तब्बल वीस बॅटऱ्या चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहेत. याबाबत युवराज इरभान वानखेडे (वय ५३ वर्षे रा. शितोळे बिल्डींग शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. अन्वी मिर्झा पूर ता. अकोले जि. अकोले) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष पवार व रवीकिरण जाधव हे करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news mobile tower battery robbery at shi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे