धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून घेऊन गेला अन्...

अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी जवळीक निर्माण केली होती.

पुणे: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी शुभम अशोक ताजणे या युवकाला अटक करत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव घेऊन दिला दम...

शिक्रापूर येथील शुभम ताजणे या युवकाने सदर अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी जवळीक निर्माण केली होती. ११ सप्टेंबर रोजी शुभम याने युवतीला आमिष दाखवून युवतीला घरून फूस लावून नेले होते. दरम्यान, युवतीच्या पालकांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे युवतीला फूस लावून नेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सदर बाबत तपास करत असताना शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन युवती व शुभम ताजणे याला ताब्यात घेत चौकशी केली.

प्रेमप्रकरणातून युवती पळाली; पण शेवट कसा झाला पाहा...

शुभम याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीला फूस लावून इतर ठिकाणी घेऊन जात युवतीवर अत्याचार केल्याबाबत पीडित अल्पवयीन युवतीने आपल्या जबाबमध्ये नमूद केले. शिक्रापूर पोलिसांनी शुभम अशोक ताजणे (वय १९, रा. शिक्रापूर ताजणे वस्ती २४ वा मैल ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवराम खाडे हे करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news minor girl tourcher and shikrapur p
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे