मंगलदास बांदल यांना बँक फसवणूक प्रकरण अंगलट....

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगी आदेश

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

पुणेः पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या काही साथीदारांवर बँकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. बांदल यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिल्याने त्यांची रवानगी येरावडा कारागृहात करण्यात येणार आहे.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर येथील एका व्यक्तीच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवत फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

मंगलदास बांदल यांच्याबाबत मोठी बातमी...

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यावेळी न्यायलयाने मंगलदास बांदल यांना एकामागे एक अनेक दिवस पोलिस कोठडी सुनावली असताना पोलिस कोठडीत असतानाच बांदल यांच्यावर फसवणुकीचे अजून दोन गुन्हे वाढल्याने बांदल जास्त अडचणीत सापडले आहेत. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने बांदल यांच्या शिक्रापूर येथील दोन व हडपसर येथील एका बंगल्यासह त्यांच्या एका कंपनीची कसून तपासणी करत झडती घेतली होती. परंतु, यावेळी काहीही मिळून आले नाही.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

न्यायालयाने पोलिसांच्या तपासाच्या मागणी साठी बांदल यांना एकामागे एक असे वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अनेक दिवस पोलिस कोठडी दिली होती. सध्या त्यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले काही सहकारी फरार झालेले आहेत. काही सहभागी सहकारी यापूर्वीच येरावडा कारागृहात गेलेले असून, न्यायालयाने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी येरावडा कारागृहात करण्यात येणार आहे. मात्र, येरावडा कारागृहाच्या सध्याच्या कोविड काळातील नियमानुसार बांदल यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. कोविड तपासणी अहवाल प्राप्त झाल्या नंतर मंगलदास बांदल यांना येरावडा कारागृहात दाखल करण्यात येणार आहे. पण, सध्याच्या या घडामोडी मूळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

मंगलदास बांदल यांनी गुन्हे दाखल झाल्याबाबत केला मोठा खुलासा

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news mangaldas bandal judicial custody
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे