पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची मोठी कारवाई...

पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

पुणे: पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने मोठी कारवाई करत भिगवण व वालचंदनगर येथे तिघांकडून स्कॉर्पिओसह २ गावठी पिस्टल, ३ काडतुसे असा सुमारे ७ लाखाचा माल जप्त केला आहे.

पोलिस खात्यातील कर्तव्यदक्ष संवेदनशील अधिकारी; पद्माकर घनवट

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. 20) गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीवरून भिगवण व वालचंदनगर येथे मिळून आलेले तिघे संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व १ स्कॉर्पिओ असा एकूण किंमत ७,५०,३००/- (सात लाख पन्नास हजार तीनशे) रुपयाचा माल जप्त केला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

चाकण परिसरात ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट...

पुणे ग्रामीण जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणेसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी मार्गदर्शनाखाली विभागानुसार गुन्हे शाखेच्या पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केलेल्या पहिल्या कारवाईत भिगवण गावचे हद्दीत पुणे-सोलापूर रोड लगत, एस.टी.स्टॅड समोरील उड्डानपुलाचे खाली (ता. इंदापूर जि. पुणे) येथे गणेश गजानन यादव (वय २६, रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे) याचे स्कार्पिओ वाहनात लपवून ठेवलेले १ गावठी पिस्टल, १ जिवंत काडतूस असा  स्कार्पिओ जीपसह एकूण किंमत रुपये ७,००,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत झाली पुन्हा वाढ...

दुसऱ्या कारवाईत वालचंदनगर जंक्शन चौक, कळस रोड (ता. इंदापूर जि. पुणे) येथे सचिन बाळू दळवी (वय २९ वर्षे रा.वालचंदनगर, रामवाडी ता. इंदापूर जि. पुणे), सुनिल सुदर्शन खरात (वय ३० वर्षे रा. रणगाव, खरातवस्ती ता. इंदापूर जि. पुणे) यांचे ताब्यातून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतूस असा एकूण किंमत ५०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सचिन दळवी व सुनील खरात हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, आरोपी सचिन दळवी याच्यावर सन २०१९ मध्ये ऍट्रॉसिटी व सन २०२० मध्ये गुटखा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सुनील खरात याच्यावर सन २०१३ मध्ये मारामारी व सन २०१९ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांना पाहाताच सुरू झाली एकच पळापळ; पण...

सदर कारवाईत गणेश गजानन यादव (वय २६ वर्षे रा.कळस ता. इंदापूर जि. पुणे), सचिन बाळू दळवी (वय २९ वर्षे रा.वालचंदनगर, ता. इंदापूर जि. पुणे),  सुनिल सुदर्शन खरात (वय ३० वर्षे रा. रणगाव, ता. इंदापूर जि. पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भिगवण व वालचंदनगर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपींनी सदरचे गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी आणले? त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का? त्याचा कोठे वापर केला आहे का? याबाबतचा अधिक तपास भिगवण व वालचंदनगर पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात लघुशंका करताना बसला वीजेच्या धक्का अन्...

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलिस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, अक्षय जावळे यांचे पथकाने केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news lcb team three arrested at walchand
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे