निरा गोळीबार खून प्रकरणातील आरोपी 'एलसीबी'च्या ताब्यात...

पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

गुंड गणेश रासकर याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, मारामारी तसेच मोक्का अंतर्गत एकूण १७ गुन्हे दाखल होते. जून महिन्यातच तो येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता.

पुणेः निरा येथील गुंड गण्या रासकर याचेवरील गोळीबार खून प्रकरणातील एका आरोपीस सातारा जिल्ह्यातून जेरबंद केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची मोठी कारवाई...

निरा (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील रेल्वे स्टेशन समोरील गणेश फ्लॉवर मर्चंट जवळ १६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०७.०० वा.चे सुमारास गुंड गणेश रासकर यास त्याचे ओळखीचे आरोपी यांनी न्यायालयीन कामकाजासाठी पैसे दिले नाहीत व इतर भांडणाचे कारणावरून गुंड गणेश विठ्ठल रासकर (रा. निरा ता. पुरंदर जि. पुणे) याचेवर रिव्हॉल्वरने गोळीबार करून त्याचा खून केला होता. याबाबत जेजूरी पोलिस स्टेशनला खुनासह आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयामध्ये आरोपी निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे (रा. पाडेगाव, ता. खंडाळा जि. सातारा), गौरव जगन्नाथ लकडे (रा. मिरेवाडी ता. खंडाळा जि. सातारा) व इतर साथीदार यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. गुंड गणेश रासकर याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, मारामारी तसेच मोक्का अंतर्गत एकूण १७ गुन्हे दाखल होते. जून महिन्यातच तो येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता.

पोलिस खात्यातील कर्तव्यदक्ष संवेदनशील अधिकारी; पद्माकर घनवट

सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. तसेच जेजुरी पोलिस स्टेशनची सुद्धा दोन पथके नेमण्यात आलेली होती. यापूर्वी गुन्हयात आरोपी नामे निखिल उर्फ गोटया रविंद्र ढावरे यास जेजुरी पोलिस स्टेशन कडून अटक करण्यात आलेली आहे.

चाकण परिसरात ATM सेंटरमध्ये अचानक स्फोट...

गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी संकेत उर्फ गोटया सुरेश कदम (वय २५ वर्षे रा. लोणी ता. खंडाळा जि. सातारा) हा सुद्धा सामील असल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्याचा राहते घरी व परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. गुन्हा घडल्यापासून तो पोलिस पकडतील या भितीने गावी न राहता फरार झालेला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून त्यास शिरवळ (ता. खंडाळा जि. सातारा) येथून जेरबंद केले आहे.

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

सदर खुनाच्या गुन्हयात सामील असल्याची त्याने कबुली दिलेली असून त्यास पुढील तपास कामी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आणखी कोण सामील आहे काय? याबाबतचा पुढील अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलिस निरीक्षक सचिन काळे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, अक्षय जावळे यांचे पथकाने केली आहे.

मंगलदास बांदल यांच्या कुटंबाच्या अडचणीत झाली पुन्हा वाढ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news lcb one arrested for nira murder ca
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे