धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये वाट पाहताना अचानक मृतदेह आला समोर...

सकाळच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये साफसफाई करण्यासाठी मामा न आल्याने सर्वजन त्यांची वाट पाहत होते. मात्र, अचानकपणे एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आला.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालय मधील कर्मचारी गोविंद शिर्के यांना सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोविंद शिर्के यांचा जागीच मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी गोविंद शिर्के हे शुक्रवारी (ता. १९) सकाळच्या सुमारास त्यांच्या त्याब्यातील दुचाकी एम एच १२ यु व्ही ९३९५ या दुचाकीमध्ये गावातील रिलायन्स पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरून पुणे नगर महामार्गवरून रस्ता ओलांडत होते. पण, अचानकपणे पुणे दिशेने अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या कोणत्यातरी वाहनाची धडक शिर्के यांना बसून अपघात झाला. दरम्यान तेथील नागरिकांनी गोविंद शिर्के यांना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमध्ये गोविंद बबन शिर्के (वय ४६ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत सुयश गोविंद शिर्के (वय १९ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

धक्कादायक! कौंटुंबिक वादातून हत्या, आत्महत्या अन्...

शिर्के यांची हॉस्पिटलमध्ये वाट पाहताना अचानक मृतदेह समोर...
शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय मध्ये कर्मचारी असलेले गोविंद शिर्के हे सदर ठिकाणी मामा म्हणून परिचित होते. सकाळच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये साफसफाई करण्यासाठी मामा न आल्याने सर्वजन त्यांची वाट पाहत होते. मात्र, अचानकपणे एका व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात आला अन तो मृतदेह शिर्के मामा यांचाच असल्याने सर्वाना धक्काच बसला.

पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news hospital employee accident at shikr
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे