बापरे! 'गरुडझेप अकॅडमी'च्या मुलांच्या जेवनात आढळल्या आळ्या...

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील खळबळजनक घटना

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे गरुडझेप अकॅडमी आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारी मुले लाखो रुपये शुल्क भरून या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.

मुलांच्या पालकांनी केली पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार
पुणे:
पिंपळे जगताप (ता. Shirur) येथे असलेल्या गरुड झेप अकॅडमी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना जेवणासाठी असलेल्या कॅन्टीनमध्ये मुले जेवण करत असताना जेवणामध्ये आळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर मुलाच्या पालकांनी याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये कामधंदा नव्हता अन् पत्नीचे बाळंतपण झाले...

पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे गरुडझेप अकॅडमी आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारी मुले लाखो रुपये शुल्क भरून या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मुलांच्या जेवणासाठी कॅन्टीन ची सोय असून, २२ नोव्हेंबर रोजी मुले जेवण करत असताना मुलांच्या जेवनातील भाजीमध्ये चक्क आळ्या आढळून आल्या. याबाबत मुलांनी त्यांच्या पालकांना माहिती दिल्यानंतर आज मुलांचे पालक सदर ठिकाणी येत त्यांनी याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली. दरम्यान, सदर बाब अन्न औषध प्रशासनाच्या अख्यारिकित असल्याने याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यानंतर अन्न औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेत गरुड झेप अकॅडमी येथे पाहणी केली.

पुण्यातील व्यापाऱयाला लातूरमध्ये लुटले; पण १२ तासातच...

ॲकॅडमीमध्ये मुलांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे असताना देखील सदर अकॅडमी चालकांकडून याकडे दुर्लक्ष होऊन मुलांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे. येथील शिक्षण घेणारी व सराव करणारी मुले कोणत्या पद्धतीत राहत असतील, यापूर्वी काय आणि कसे कसे प्रकार घडले असतील असा देखील सवाल नागरिकांना पडलेला आहे. सदर गरुड झेप अकॅडमीची सर्वच बाबींची तपासणी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलांचे संतापलेले पालक तुळशीराम थापेकर,  संदीप नेहरकर, कैलास डुंबरे यांनी केली आहे.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी...

लाखो रुपये खर्च करून मुलांचे आरोग्य धोक्यात...
पिंपळे जगताप येथील गरुडझेप अकॅडमी मध्ये शिक्षण कार या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पालकांनी वेळ प्रसंगी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून मुलांना प्रवेश मिळवून दिला आहे. मात्र, सदर घडलेल्या प्रकारामुळे लाखो रुपये खर्च करून देखील मुलांचे आरोग्य धोक्यात आल्याची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली असल्याने पालक देखील चिंता व्यक्त करत आहे.

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

पिंपळे जगताप येथील गरुड झेप अकॅडमी मध्ये जेवणात आळ्या निघाल्याचा अर्ज या ठिकाणी आलेला होता. मात्र, सदर प्रकार अन्न औषध प्रशासन यांच्या कडील असल्यामुळे सदर तक्रारदारांना त्यांच्या विभागाचा मेल आयडी देऊन त्या मेल वर तक्रार करण्यास सांगितले होते. त्यांनतर सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी याठिकाणी येत अर्ज घेऊन त्याबाबत पोलिस स्टेशनला नोंद करून गरुड झेप अकॅडमी पाहणी करण्यासाठी जात असल्याचे कळविले, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

आमच्या ॲकॅडमी बाबत करण्यात आलेली तक्रार ही खोटी असून, त्याबाबत चौकशी सुरू आहे. ज्या मुलांची तंबाखू पकडली, ज्या मुलांना ॲकॅडमी मधून काढले त्यांच्या पालकांनी तक्रार केली आहे. सदर बाब ही चौकशी अंती समोर येईल. आमच्याकडे सातशे मुले असून त्यापैकी फक्त तीनच मुलांनी याबाबत तक्रार केलेली आहे, असे गरुड झेप अकॅडमी चे संचालक सोनवणे यांनी सांगितले.

कॅप्टन अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान, तर...

दरम्यान, पिंपळे जगताप येथील गरुड झेप अकॅडमी मधील घडलेल्या प्रकाराबाबत प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news garud zep academy student food foun
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे