पुणे जिल्ह्यात होळीच्या दिवशी गोळ्या घालून एकाची हत्या...

होळीच्या दिवशीच एकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणेः पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात होळीच्या दिवशीच एकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे  (रा. पाबे, रामवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेणूसे हे वेल्हे तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवनाथ रेणूसे यांची हत्या करणारे आरोपी हे त्यांच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे. खून झालेल्या युवकावर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत. वेल्हे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पुणे शहरातही गोळीबार...
पुणे शहरातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हवेमध्ये गोळीबार घडली होती.  याप्रकरणी अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहे. 

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पुणे शहरात दिवसाढवळ्या गोळीबार; एक जण गंभीर जखमी...

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर कुटुंबासमोरच गोळीबार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune district crime news firing at welhe taluka one dead and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे