थरारक! पुणे जिल्ह्यात खूनाचा बदला खूनाने...

पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दगड, कोयता आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली.

पुणेः लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोल्ड मॅन सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी गोळी झाडून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपी कारागृहात होते. त्यातील एक आरोपी तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टिक आणि दगडाने मारहाण करून निर्घृण खून केला आहे. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी (ता. १२) सायंकाळी हा प्रकार घडला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या वडिलांवरील हल्लेखोरांनी वार केले. यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

आम्ही पोलिस आहोत, या रस्त्याने चोर फिरत आहेत...

प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मराठी शाळे पासून शिंदे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी गोळ्या झाडून सचिन शिंदेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सनी शिंदे सह तिघांना अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्याने सनी शिंदे हा कारागृहातून बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी तो वडिलांसह लोणीकंद परिसरातून चारचाकी गाडीने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर दगड, कोयता आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील कुमार शिंदे हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले. आरोपींनी त्यांच्यावर देखील वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यातील काही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news father and son murder at lonikand
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे