आमदारांच्या मिरवणुकीला येणे युवकाला पडले महागात...

संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाच जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

पुणे: सणसवाडी (ता. Shirur) येथे नुकतेच पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांची मिरवणूक व सत्कार समारंभ आयोजित केला होता. सदर मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने युवकाच्या गळ्यातील साडेचार तोळे वाजनाची चैन चोरून नेल्याने आमदारांच्या मिरवणुकीला येणे युवकाला महागात पडले आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापरे! कारागृहात कारवाईच्या भीतीने कैद्याने गिळला मोबाईल...

सणसवाडी (ता. शिरूर) येथे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाच जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान व मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी येथील हिरामण दरेकर हे सदर ठिकाणी मिरवणूक व सत्कार कार्यक्रम ठिकाणी आलेले होते. दरेकर यांच्या गळ्यात साडेचार तोळे वजनाची सोन्याची चैन होती. दरम्यान, येथून पायी जात असताना येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कोणीतरी गर्दीचा फायदा घेत हिरामण दरेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली असल्याचा प्रकार घडला.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

याबाबत हिरामण शिवाजी दरेकर (वय ३२, रा. खंडोबा मंदिराजवळ सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार संदीप कारंडे हे करत आहेत.

पोलिस स्टेशनच्या आवारातच माजी सरपंचासह वकिलांची हाणामारी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news chain robbery at mla ashok pawar ra
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे