बनावट कोविड सेंटर आणि डॉक्टर काय करायचा पाहा...

शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफास करण्यात प्रशासनाला यश आले आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिक्रापूर (पुणे): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफास करण्यात प्रशासनाला यश आले आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल असून, येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी यादी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आले आहे.

धक्कादायक! आणखी एक कोविड सेंटर चालवणारा डॉक्टर निघाला बोगस

शिक्रापूर येथे आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरु करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या भीतीचा वापर करून रुग्णांना दाखल करून घेत बनावट पद्धतीने हॉस्पिटल सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनतर शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, तलाठी अविनाश जाधव, आशिष पवार, पोलिस शिपाई प्रफुल्ल सुतार, कृष्णा व्यवहारे यांसह आदींनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.

मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील या बोगस डॉक्टरचा प्रवास पाहा...

Image

बापरे! बारावी नापास; बोगस नाव अन् चालवत होता हॉस्पिटल

सदर हॉस्पिटल हे डॉ. निखील इंगळे यांच्या नावावर नोंदणी असून, येथील रुग्णांवर रामेश्वर बंडगर हा व्यक्ती उपचार करत असल्याचे तसेच या ठिकाणी सोळा रुग्ण उपचार घेत असून प्रत्येकाकडून सदर डॉक्टरने पन्नास हजार रुपये जमा करून घेतले होते. यापैकी फक्त पाच रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आलेली आहे तर अकरा रुग्णांचे फक्त स्क्यान करून दाखल करून घेतले असल्याचे समोर आले. मात्र, सदर ठिकाणी डॉ. निखील इंगळे नावाचा व्यक्ती कधीही आलेला नसल्याचे आजूबाजूचे नागरिक तसेच रुग्णांच्या नातेवाइकांकडून समजले.

बोगस डॉक्टरचा आणखी एक 'प्रताप' उघडकीस...

यावेळी प्रशासनाने येथील सर्व रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये हलविले आहे. येथील रामेश्वर विठ्ठलराव बंडगर, गजानन विठ्ठलराव बंडगर, प्रशांत राजाराम मोरे, राहुल बाळासाहेब पवळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बोलताना सदर प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर उशिरा पर्यंत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.

बारावी नापास शेख बनला होता डॉक्टर महेश पाटील; शिवाय...

हॉस्पिटल आधार नावाने चिठ्ठी मात्र साईधाम नावाने...
शिक्रापूर येथे प्रशासनाने शुक्रवारी (ता. 23) केलेल्या कारवाईत हॉस्पिटलचे नाव आधार हॉस्पिटल असून, येथे रुग्णांना औषधोपचारासाठी देण्यात येणारी यादी मात्र साईधाम नावाने देण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समोर आले आहे.

पाच महिन्यांनापूर्वी याच डॉक्टरने केले होते खंडणीचे गुन्हे दाखल...
शिक्रापूर शिरूर येथे मागील पाच महिन्यांपूर्वी एका माजी सरपंचासह आदींवर खंडणी व अपहरण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असताना सदर हॉस्पिटल चालविणाऱ्या याच रामेश्वर बंडगर याने गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे सदर डॉक्टरच बोगस असून, त्याला नेमके कोणाचे अभय मिळत आहे? अशी चर्चा आता परिसरात रंगली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news bogus covid hospital at shikrapur p
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे