पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱयाची पाहणी केली अन्...

बारामती पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

बारामती शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख यांनी दिल्या होत्या.

बारामती (पुणे): बारामती शहर पोलिसांनी दुचाकी चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली. या टोळीकडून २० लाख रुपये किमतीच्या १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी योगेश विलास चिरमे (वय २३, रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मोबाईल लागत नसल्यामुळे शोध सुरू केला अन् धक्का बसला...

बारामती शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिले होते. पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सपोनि प्रकाश वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, बंडू कोठे, अजित राऊत, सायबर शाखेचे सपोनि मोहिते, तेचन पाटील, गोपाळ ओमासे यांचे पथक तयार केले होते.

भयानक! कुत्र्यावर तलवारीने हल्ला करून केले ठार

पथक तपास करत असताना शुक्रवारी (ता. 30) पहाटे 3.30 वाजता प्रथमेश अपार्टमेंट, दत्तनगर, कसबा येथून पल्सर चोरीला गेली होती. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चिरमे याचे नाव पुढे आले. त्याचा शोध घेत त्याच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना सापळा रचून अटक केली. त्यांची पोलिस कोठडी घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी शहर, तालुका, फलटण, सासवड, दौंड आदी ठिकाणाहून १८ दुचाकी चोरल्याचे समोर आले.

खाकीतील माणुसकी; आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला किराणा

दरम्यान, या दुचाकी त्यांनी गजानन दत्तू चव्हाण, नीलेश उर्फ सोन्या चिलम उर्फ उदय मोहन शोवगन यांना विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून २० लाखाच्या दुचाकी हस्तगत केल्या. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

इतिहास पोलीस दल निर्मितीचा... (अशोक इंदलकर)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: pune district crime news baramati police bike robber arreste
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे