जमीन बँकेला गहाण ठेवून कर्ज काढले अन् त्यानंतर...
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.पुणे: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील जमीन बँकेला गहाण ठेवून कर्ज काढल्यानंतर बँकेचे कर्ज थकवून सदर जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अनिल सुखदेव वाळके यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जावयाने वीट घातली सासूच्या डोक्यात; कारण पाहा...
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील अनिल वाळके यांनी त्यांची जमीन शिक्रापूर येथील लाल अर्बन बँकेकडे गहाण ठेवून जमिनीचे दस्त बनवून देत बँकेकडून पंधरा लाख रुपये कर्ज काढले होते. त्यांनतर वाळके यांनी बँकेचे कर्ज भरले नाही. त्यामुळे बँकेने सदर जमिनीवर कारवाई करण्याचे ठरवल्याने जमिनीचा सातबारा काढण्यात आला. त्यावेळी सदर जमीन शत्रुघ्न माधव सोंडेकर व अरुण हरिभाऊ बेंडभर यांच्या नावावर असल्याचे समोर आले. बँकेने तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या दस्त बाबत पाहणी केली असता अनिल वाळके यांनी सदर जमिनीवर कर्ज घेतल्यानंतर सदर जमीन शत्रुघ्न माधव सोंडेकर व रामचंद्र माधवराव जगताप यांना विक्री केली. त्यांनतर रामचंद्र जगताप याने पुन्हा त्याच्या हिस्स्याची जमीन शत्रुघ्न माधव सोंडेकर व अरुण हरिभाऊ बेंडभर यांना विक्री केल्याचे आढळून आले.
पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब नव्हे तर काय आढळले पाहा...
अनिल वाळके याने बँकेकडे तारण असलेली जमीन बँकेच्या परस्पर विक्री केल्याचे समोर आल्याने याबाबत शिक्रापूर येथील लाला अर्बन बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र गोविंद शिंदे (वय ४७ वर्षे रा. चांदोली खुर्द ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अनिल सुखदेव वाळके (रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.
राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...