एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

पोलिसांनी तपास करत असताना गोपनीय माहिती काढली असता वरील आरोपींनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

पुणे: मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे धाडसी दरोडा टाकून एटीएम मशीन सह सुमारे ८ लाख ३८ हजार रुपये रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी मल्हारी भीमराव केदार (वय २९, रा. शिरूर कासार, जिल्हा. बीड), बाळासाहेब एकनाथ केदार, संभाजी त्रिंबक मिसाळ (सर्व रा. शिरूर कासार, बीड) यांना अटक केली आहे.

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथे सात ऑक्टोबर रोजी तसेच दौंड तालुक्यातील खडकी येथे १० ऑक्टोबर रोजी एटीएम चोरीचे गुन्हे घडले होते. पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीत येऊन एटीएम मशीन सह रोकड लांबविण्यात आली होती. याबाबत शिरूर व दौंड पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती गोळा केली. यावेळी स्कॉर्पिओ गाडी आष्टी बाजूकडे गेल्याचे सीसीटिव्ही मध्ये दिसून आले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

पोलिसांनी तपास करत असताना गोपनीय माहिती काढली असता वरील आरोपींनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मल्हारी भीमराव केदार (वय २९, रा. शिरूर कासार, जिल्हा बीड), बाळासाहेब एकनाथ केदार, संभाजी त्रिंबक मिसाळ (सर्व रा. शिरूर कासार) या आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली गाडी हडपसर परिसरातून चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

यातील आरोपी मल्हारी केदार, बाळासाहेब केदार यांच्यावर एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहे. तसेच विविध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, सचिन काळे संदीप येळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, चंद्रकांत जाधव, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, सहायक फौजदार मुकुंद कदम यांनी केला आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news atm robbery gangster lcb arrested a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे