पाठीमागून आलेल्या वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली अन्...

पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

पुणेः पाबळ (ता. Shirur) येथील एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरट्यांनी खिडकीतून दरवाजा उघडत घरात प्रवेश केला अन्...

पाबळ (ता. शिरूर) येथील पाबळ-लोणी रस्त्याने रोहिदास गोरडे हे त्यांच्या जवळील एम एच १४ ई एक्स ९०५८ या दुचाकीहून जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गोरडे गंभीर जखमी झाल्याने येथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र,  उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत रोहिदास नाथू गोरडे (रा. गोसासी ता. खेड जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. 

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

याबाबत खंडू धोंडीभाऊ गोरडे (वय ४५ वर्षे रा. गोसासी ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव स्वामी व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहेत.

उसतोड करताना मानवी सांगाडा आढळल्याने उडाली खळबळ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news accident at shirur taluka and one d
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे