एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीत; कारण समोर...

भीमा नदी पात्रातील पारगाव (ता. दौंड) हद्दीत सहा दिवसांपासून अनेक मृतदेह आढळून आले होते. आता त्याचा आकडा सातपर्यंत पोहोचला आहे.

पुणे : भीमा नदी पात्रातील पारगाव (ता. दौंड) हद्दीत सहा दिवसांपासून अनेक मृतदेह आढळून आले होते. आता त्याचा आकडा सातपर्यंत पोहोचला आहे. मुलगी पळवून नेल्याच्या रागात वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे आहेत. मंगळवारी (ता. 17)  रात्री अकरानंतर वाहनाने हे कुटुंब निघोज या गावातून निघाले होते. शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि  22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सामूहिक आत्महत्येप्रकरणाची धक्कादायक माहिती समोर...

पुणे शहरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या...

पुणे शहरातील डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्यामागचे कारण समोर...

पुणे शहरात डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune daund bhima river 7 members of a pune family ended thei
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे