बिबवेवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यास हरियाणामधून केली अटक...

आरोपी हा B.Tech इंजिनिअर असून कोणताहीमोबाईल व डेबीट कार्ड चोरी करुन एक दिवसात त्याचे बॅंक खाते रिकामे करतो.

पुणेः मोबाईल, डेबीटकार्डची चोरी करुन सराईतपणे बॅंक खाते रिकामे करणा-या उच्च शिक्षीत चोरटयाला बिबवेवाडी पोलिसांनी फरिदाबाद (हरियाणा) येथून जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात युनिट २ कडून तडीपार गुन्हेगार जेरबंद....

बिबवेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीत यातील फिर्यादी हे क्रिकेट टुर्नामेंट मॅच खेळण्यासाठी राजयोग लॉन्स येथे त्यांची कार सुझुकी सियाज हि घेवून आले होते. कार पार्क केले ठिकाणी तिचा दरवाजा लॉक न करता खेळण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान त्याचे गाडीतून सॅमसंग कंपनीचा टॅब, अॅक्सीस बॅंकेंचे दोन डेबीट कार्ड अज्ञाताने चोरी केले होते. शिवाय, त्यांचे डेबीट कार्डव्दारे १ लाख कॅश काढून व कार्ड व्दारे २,९९,२०० रुपयांची खरेदी करून एकूण ४,११,२०० रुपये किमंतीच्या मालमत्तेची चोरी केल्याची तक्रार बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे दाखल झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस स्टेशन तपासपथक यांनी तपास सुरू करून फिर्यादी यांचे प्राप्त बँक डिटेल्स यावरून आरोपीने पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे व फिर्यादी यांचे एटीएम कार्डवरून बदरपुर हरियाणा येथे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. 

पुणे शहरातून तडीपार असलेल्या गुन्हेगाराला युनिट-१ ने केले जेरबंद...

आरोपी हा विमानाने गेला असल्याचा संशय बळावल्यामुळे लोहगाव विमानतळ पुणे येथे जावून तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून व आरोपीचे तिकीट बुकींगवरून त्याचे नाव व पत्ता टिंवकल अर्जुन अरोरा (रा. हाऊस नं. ११४३, सेक्टर नं. ७ सी, बलभगड, जि. फरिदाबाद, राज्य हरियाणा) व त्याचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता. त्यावरून तपास पथकाचे अधिकारी प्रविण काळुखे व अमंलदार यांची टिम तयार करून त्यांना हरियाणा येथे पाठवून तांत्रिक विश्लेषन करून शिताफीने आरोपीस त्याचे वरील पत्यावर ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे तपास करता असे निष्पन्न झाले की आरोपी हा B.Tech इंजिनिअर असून कोणताहीमोबाईल व डेबीट कार्ड चोरी करुन एक दिवसात त्याचे बॅंक खाते रिकामे करतो. त्याचेकडे गुन्हयातील मालाबाबत तपास करून एकूण ३,७४,९००/-किमंतीचे एक अॅपल १३ प्रो व सॅमसंग झेड फोल्ड ३, दोन सोन्याचे कॉईन, रोख रक्कम ४०,०००/- रुपये असा ऐवज हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

पीएमपीएलमध्ये चोरी करणाऱया महिलांना स्वारगेट पोलिसांकडून अटक

सदर कारवाई ही अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलिस उप आयुक्त नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व  सहा. पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस अमंलदार शामराव लोहमकर, संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर व राहुल शेलार यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.

बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १० गुन्हे उघडकीस...

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोक्का अंतर्गत ८२वी कारवाई...

सोनारांना फसवणाऱया सराईत महिला पोलिसांच्या ताब्यात...

पोलिसकाकाच्या ‘मासे आणायला जायचंय...’ रजा अर्जाबाबत खरी माहिती समोर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune cyber crime news bibwewadi police arrested from hariyan
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे