पुणे शहरातील युवतीची लाखो रुपयांची फसवणूक; कशी ती पाहा...

युवती फॅशन डिझायनर आहे. अमितने काही दिवसांपुर्वी बेटर हाफ सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर राहूल पाटील असे खोटे नाव सांगून ओळख वाढवली.

पुणे: पुणे शहरातील एका 28 वर्षीय युवतीची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये 9 लाखांची रोकड आणि आयफोनसह 10 लाख रुपयांचा समावेश आहे. याप्रकरणी अमित चव्हाण (वय 30) याला ताब्यात घेण्यात आले आहे. औंध परिसरात एप्रिल ते 7 जुलै या कालावधीत ही घटना घडली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

'मै कराची से बोल रहा हु। तुने अपना काम बढा लिया...'

युवती फॅशन डिझायनर आहे. अमितने काही दिवसांपुर्वी बेटर हाफ सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर राहूल पाटील असे खोटे नाव सांगून ओळख वाढवली. त्यानंतर त्याने फिर्यादीला अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत दुबई, अमेरिका, भारतात देखरेखीखाली असल्याची बतावणी केली. भारतामध्ये आम्ही तपासासाठी आलो आहोत. तुझ्यावर रॉ ची नजर आहे, अशी भीती त्याने तिला दाखविली. त्यानंतर अमितने मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिच्याकडून वेळोवेळी रक्कम ऑनलाईन घेतली. त्यामध्ये रोकडसह 1 लाख 28 हजार रुपयांच्या लॅपटॉपचा समावेश आहे.

मी डॉन आहे, तू डॉनला जेवणाचे पैसे मागतो का?...

चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे म्हणाले, 'त्या व्यक्तीने युवतीसोबत संपर्क साधून ओळख वाढविली. त्यानंतर त्याने अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून युवतीवर रॉ ची नजर असल्याची भीती घातली. मोठ्या रक्कमेसह लॅपटॉप घेतला. यासंदर्भात आरोपीला ताब्यात घेतले असून, आणखी तपास सुरू आहे.'

मोटार सायकलवर येऊन एका विवाहित शिक्षिकेचा विनयभंग अन्...

धक्कादायक! महिला डॉक्टरच्या बेडरुममध्ये सापडला स्पाय कॅमेरा...

प्रेमविवाह झालेल्या पतीला खोलीत पाहिल्यावर बसला धक्का...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news youth cheating girl police register complain
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे