पतीच्या अंथरुणात ठेवले लाल कुंकू, मंतरलेले लिंबू अन्...

आरोपी महिलेने लाल कुंकू, मंतरलेले लिंबू, तांदूळ अशा गोष्टी पतीच्या अंथरुणात टाकायला सुरुवात केली. आपल्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्य शक्ती आहे.

पुणे : 'मांत्रिकाचे ऐकले नाही तर खानदानाचा सर्वनाश होईल', असे धमकावत पत्नीनेच पतीला ब्लॅकमेल केल्याची घटना कोथरूडमध्ये उघडकीस आली आहे. शिवाय, आरोपी महिलेने मांत्रिकाच्या मदतीने आपल्या पतीकडे तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पत्नीसह माहेरच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

धक्कादायक! आपण गर्भवती असल्याचे समजले तर काय होईल?

कोथरूड परिसरातील कुंबरे पार्क सोसायटीत ही घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबाला ब्लॅकमेल करण्याचे आणि धमकावण्याचे कृत्य सुरू होते. याप्रकरणी भूगाव येथील रहिवासी असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह माहेरच्या 12 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

विवाह झाल्यानंतर दोघांचे पटत नव्हते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. पण 2014 मध्ये पुन्हा दोघांमध्ये तडजोड करण्यात आली आणि दोघेही एकत्र राहू लागले. 2020 मध्ये पत्नीने माहेरच्या मंडळीच्या सांगण्यावरून पतीसोबत अघोरी कृत्य करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आरोपी महिलेने लाल कुंकू, मंतरलेले लिंबू, तांदूळ अशा गोष्टी पतीच्या अंथरुणात टाकायला सुरुवात केली. आपल्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्य शक्ती आहे. त्याचं ऐकलं नाही तर खानादानाचा सर्वनाश होईल, असे पत्नीने पतीला धमकावले. शिवाय, ब्लॅकमेल करत 1 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारू, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कारकिर्दीतील ५३ वा मोक्का...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news wife blackmail husband and demand rs 1 crore
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे