पहाटेच्या अंधारात गुपचुप 15 दिवसांच्या मुलीस भेटायला आला अन्...

युनिट-५ गुन्हे शाखचे मोठी कारवाई

आरोपी त्याच्या १५ दिवसाचे मुलीला भेटणेसाठी येणार असलेची बातमी पोलिस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख व पृथ्वीराज पांडोळे यांना मिळाली होती.

पुणेः पोलिसांवर हल्ला करणारा मोक्कामधील कुविख्यात फरारी गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे व वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हृदयद्रावक! विहिरीतील दृष्य पाहून उपस्थित ठसाठसा रडले...

कोथरुड पोलिस स्टेशनचे हद्दीत पोलिसांना हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारणेचा प्रयत्न केले बाबत आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्या गुन्हयातील पाहिजे आरोपी जयसिंग उर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २८, रा. स.नं.८६, बिराजदारनगर, वैदवाडी, हडपसर पुणे) हा गुन्हा केले पासून फरार होता. सदर आरोपीचा युनिट ५ कडून मागील काही महीन्यापासुन शोध घेण्याच्या प्रयत्न चालू होता. परंतु, सदरचा आरोपी हा सराईत असल्याने मिळून येत नव्हता. १४/५/२०२१ रोजी जयसिंग जुनी हा त्याच्या १५ दिवसाचे मुलीला भेटणेसाठी येणार असलेची बातमी पोलिस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख व पृथ्वीराज पांडोळे यांना मिळाली होती.

...तर सर्पदंश झालेल्या मुलीचा जीव नक्कीच वाचला असता

युनिट -०५, गुन्हे शाखेचे अधिकारी पोउनि सोमनाथ शेंडगे व अंमलदार यांनी आरोपीस पकडण्यासाठी सुमारे २४ तास त्याचे राहते घराजवळ सापळा रचला. सदरचा आरोपी अंधारात पहाटेच्यावेळी गुपचुप मुलीस भेटणेसाठी आला असता त्यास मोठया शिताफिने पाठलाग करुन पकडण्यात आले. आरोपीस पकडताना आरोपीने स्वतःस मारुन घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी त्याचा तो प्रयत्न हाणून पाडला व त्यास मोठया शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिस भरती बाबत मोठी बातमी...

सदरचा आरोपी हा मागील काही महीन्यापासुन मोक्कामधुन फरार होता. सदर आरोपीकडे कौशल्यपुर्व तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार पाप्पासिंग दुधानी (रा. म्हाडा, हडपसर) याचेसह पुणे शहरात मोटर सायकली व कार चोरी करुन त्याचेवर घरफोडीचे ठिकाणाची रेकी करुन घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केल्याने त्यास हडपसर पो.स्टे. कडील गुन्हा रजि. नं. ६४०/२०२१, भा.दं.वि. कलम ४५४, ३८०, ३४ या गुन्हयात अटक केली. अटक मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याचेकडून एकूण कि.रु. १२,४०,०००/- चा ऐवज त्यामध्ये दोन मोटर सायकल, दोन सॅन्ट्रो कार, सोन्याचे दागीने, तसेच कोयते, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी असे घरफोडीचे हत्यारे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून एकूण घरफोडीचे ०८ गुन्हे त्यामध्ये हडपसर येथील ०२, कोंढवा येथील ४, भारती विद्यापीठ व सहकार नगर येथील प्रत्येकी १ व वाहनचोरीचे ०४ त्यामध्ये हडपसर, मार्केटयार्ड, स्वारगेट व सासवड येथील प्रत्येकी ०१ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहे. 

पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुकाने बंद: अजित पवार

नमुद आरोपीकडुन उघडकीस आलेले वाहनचोरीचे एकुण ०४ गुन्हे -
१) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ७४६/२०२१, भादंवि ३७९
२) मार्केटयार्ड पो.स्टे. गु.र.नं. ११८/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९,
३) स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं. १३५/२०२१, भा.दं.वि. कलम ३७९
४) सासवड पो.स्टे. गु.र.नं. २७८/२०२१, भा.दं.वि. कलम ३७९
तसेच नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो पुणे शहरात वेगवेगळया पोलिस ठाणे येथील एकुण ०७ गुन्हयात पाहिजे आरोपी असुन ते गुन्हे पुढील प्रमाणे -
१) कोथरुड पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १३८/२०२१ भा.दं.वि.कलम ३०७, ३९५, ३९७, ३५३ सह आर्म अॅक्ट४,२५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा कायदा कलम ३(१)(ii),३(२),३(४)
२) हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ३३१/२०२१ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८०,
३) हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ६९१/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९,
४) कोंढवा पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ४७/२०२० भा.दं.वि.कलम ३८०,३४,
५) कोंढवा पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ८८/२०२० भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८०,
६) डेक्कन पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ५७/२०२१ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,५११,३४
७) चंदननगर पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. १६५/२०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,३४

भारती विदयापीठ पोलिसांकडून आरोपी जेरबंद; काय चोरले पाहा...

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, (अतिरिक्त कार्यभार), श्रीमती भाग्यश्री नवटके, पोलिस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, प्रसाद लोणारे, पोलिस उप निरीक्षक, सोमनाथ शेंडगे, पोलिस अमंलदार रमेश साबळे, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विशाल भिलारे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, आश्रुबा मोराळे, दत्ता ठोंबरे, अमर उगले, दिपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केली आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news unit 5 team one arrested crime and robbery c
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे