धक्कादायक! सॉफ्टवेअर अभियंता आढळला रक्ताच्या थारोळ्यात...

पोलिसांनी दोन्ही मित्रांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.

पुणे : कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सॉफ्टवेअर अभियंता आपल्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी मृत अभियंत्याचे दोन मित्र घरातच होते. त्यामुळे ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत गूढ निर्माण झाले असून, याप्रकरणी कोंढवा पोलिस तपास करत आहेत.

एक तोंड बांधलेला युवक अंधारात उभा असल्याचे दिसला अन्...

गणेश यशवंत तारळेकर (वय 47) असे मृत सॉफ्टवेअर अभियंत्याचे नाव आहे. तारळेकर हे विवाहित असून, त्यांना 14 वर्षांचा एक मुलगा आहे. पण त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते. दरम्यान तीन दिवसांपासून मृत गणेश तारळेकर आणि त्यांचे अन्य दोन मित्र तारळेकर यांच्या घरात पार्टी करत होते. दारू प्यायल्यानंतर तारळेकर यांनी अचानक स्वत: च्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती त्यांच्या दोन मित्रांनी दिली.

बापरे! कपाट उघडताच पैशांची बंडले पाहून बसला धक्का...

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश यांना पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केल होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मित्रांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत.

Title: pune crime news software engineer found dead in his own hous
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे