पोलिस दलातील भरतीदरम्यान कॉपीचा भलताच प्रकार...

पोलिस नाईक शशिकांत देवकांत यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला त्यांचंही पोलिस दलात कौतुक केले जात आहे.

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस भरतीसाठी आज (शुक्रवार) घेतल्या जाणाऱ्या लेखी परिक्षेसाठी आलेल्या एका उमेदवाराने चक्क मास्कमध्ये मोबाईल गॅझेट तयार करून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशरीरित्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

धक्कादायक! कौंटुंबिक वादातून हत्या, आत्महत्या अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस दलात शिपाईच्या 720 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवल्या जात असून, त्यासाठी आज लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, राज्यातील पुणे,अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यातील 440 केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे आणि एकूण 1 लाख 90 हजार उमेदवार हे परीक्षा देत आहेत. याच दरम्यान हिंजवडी येथे असलेल्या ब्लुरीज या परीक्षा केंद्रावर एक उमेदवार आला तेव्हा त्याने लावलेला मास्क जाड होता. तो तपासण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. मात्र, त्याच वेळी तो उमेदवार आपल्या अर्जावर फोटो लावण्यासाठी म्हणून मागे गेला आणि परत आलाच नाही. पोलिसांनी जप्त केलेला मास्क तपासला तर त्यामध्ये पूर्ण मोबाईला सेटअॅप तयार केल्याचे आढळून आले.

दरम्यान, पोलिस नाईक शशिकांत देवकांत यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला त्यांचंही पोलिस दलात कौतुक केले जात आहे. पोलिसांनी संबंधित उमेदवारा विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे ठरवले आहे.

पुणे पोलिसांनी आवळल्या सराईत वाहन चोराच्या मुसक्या...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news screens and batteries in masks police recrui
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे