ससून रुग्णालयात गोळीबार; कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला...

ससून रुग्णालयातील कैदी वार्डमध्ये घुसून गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे : ससून रुग्णालयातील कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ५) रात्रीच्या सुमारास घडली आहे. 

परभणी जिल्ह्यात मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करून खून...

तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेले काही वर्ष तो कारागृहात आहे. दहा दिवसांपूर्वीच त्याची तब्येत बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात कैदी वॅार्डमध्ये हलवण्यात आले होते. सोमवारी रात्री नातेवाईक असल्याचं भासवून दोन जण कैदी वॅार्डमध्ये शिरले आणि हंबीर यांच्यावर गोळीबार केला. शिवाय, सोबत आणलेल्या तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी अमोल बागड यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत बागड जखमी झाले आहेत. त्यानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. बंडगार्डन पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

पुणे शहरात पेईंग गेस्ट म्हणून राहिला अन् रुममेटचे...

दरम्यान, तुषार हंबीर याच्यावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही 2019 मध्ये येरवडा कारागृहात कैद्यांच्या झालेल्या हाणामारीत तो गंभीर जखमी झाला होता. हंबीर हा मोहसीन शेख खूनातला आरोपी आहे. तीन कैद्यांनी हंबीरवर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी शाहरुख उर्फ राशिद शेख, अमान रियाज अंसारी आणि सलीम शेख या तिघांना हंबीरवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी अटक केली होती. या तिघांनी दगड आणि खिळ्यांनी हंबीरवर वार केले होते.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune crime news sassoon hospital attacked with sword police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे