पुण्यात दहशत पसरविणाऱया टोळीतील आरोपींवर मोक्का

पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे: टोळीचे वर्चस्वाचे कारणांवरुन जीवे ठार मारण्याच्या उददेशाने डोक्यात कोयत्याने वार करुन व लाकडी दांडक्याने मारहाण करुन परिसरात दहशत पसरविणारे टोळीतील आरोपींवर हडपसर पोलिसांकडून मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.

लोणी काळभोर व लोणीकंद परिसरात 'पुणे पॅटर्न' राबविणार: अमिताभ गुप्ता

13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लेन नं 12, संकेत विहार, फुरसुंगी, हडपसर, पुणे या ठिकाणी 15 ते 20 आरोपींच्या टोळक्याने राहूल हरी घडई (वय 23, धंदा मजूरी रा. म्हसोबा मंदीरजवळ, गणेश कॉलनी, काळे पडळ, पुणे) याचे वडिलांसोबत गाडी पार्क करण्याच्या किरकोळ वादाचा राग मनात धरुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उददेशाने डोक्यात कोयत्याने वार करुन व लाकडी दांडक्याने मारहाण करुन रक्ताच्या थारोळयात पडले. जीवंत असल्याचे पाहुन पुन्हा त्याचे तोंडावर दगड मारुन सदर परिसरात दहशत माजवून त्याचे मदतीला कोणालाही येऊ दिले नाही. मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून हडपसर पोलिस ठाणे गु.रजि.नं.145/21 भा.दं.वि. क-307, 325, 323, 506, 141, 143, 147, 148, 149, भारतीय हत्यार कायदा कलम -4 सह 25, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम-37(1)(3)सह 135, क्रिमीनल लॉ. अमांडमेंट अॅक्ट कलम- 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल आहे.

पुणे शहरात पोलिस आयुक्तांचे कडक कारवाईचे आदेश

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हयातील निष्पन्न व अटक आरोपी 1) अस्लम पोपट शेख (वय 23, रा.तिरंगा चौक, आदर्शनगर वैष्णवी सिटी शेजारी देवाची ऊरळी पुणे), 2) स्वप्नील ऊर्फ ऋषभ महेंद्र हिवाळे (वय 24, रा.स.नं. 53, बर्फ कारखान्यासमोर काळेपडळ हडपसर पुणे), 3) शुभम हरिवंश तिवारी (वय 19, रा. गल्ली नंबर- 02, ससाणेनगर हडपसर पुणे), 4) अनिकेत राजू वायदंडे (वय 22, रा.गल्ली नंबर- 02, साईविहार कॉलनी, राजू कुदळे यांचेकडे भाडयाने काळेपडळ हडपसर पुणे), 5) ओंकार गोरख वाघमारे (वय 20, रा.गल्ली नंबर- 03, घर नंबर- 02 काळेपडळ हडपसर पुणे), 6) आमिर ऊर्फ तिवारी अस्मद शेख (वय 23, रा. गल्ली नंबर-28 अे, उजव्या बाजूला तैय्यबा मंदिराशेजारी सय्यदनगर वानवडी पुणे), 7) सौरभ लिंबराज घोडके (वय 19 वर्षे रा.आदर्शनगर गल्ली नंबर-3, वैष्णवी सिटी जवळ ऊरळी देवाची पुणे), 8) अर्शद शरीफ पटेल (वय 19 वर्षे रा.आदर्शनगर रॉयल चिकन सेंटर पुढील गल्लीमध्ये शेवटचे घर,ऊरळी देवाची पुणे), 9) अविनाश उर्फ अवि भाउराव पाटील (वय 23 वर्षे रा.गल्ली नं.1 मोयर्स कॉलनी संतोषी माता नगर काळेपडळ हडपसर पुणे), 10) रहिम करिम शेख (रा. काळेपडळ हडपसर पुणे (अटकपुर्व जामीनावर) आणि दोन अल्पवयीन मुलांवर आरोपींनी दाखल गुन्हा हा स्वत:चे टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दोन कोटींचे साहित्य जप्त...

नमुद आरोपीं विरुध्द दाखल गुन्हयांस महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(त्त्),3(2),3(4) चा अंतर्भाव करणेबाबत अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांचे कार्यालयाकडे पाठविला असता त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 23(1)(अ) प्रमाणे मंजूरी देणेत आलेली आहे. त्यावरुन हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं 145/2021 या गुन्हयामध्ये मोक्का कायदयाची कलमे समाविष्ट करणेत आलेली आहे. पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त हे करीत आहेत.

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. संजय शिंदे, नम्रता पाटील यांचे मार्गर्शनाखाली हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, राजू अडागळे, दिगंबर शिंदे, गोरख दरेकर, पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, अमोल घावटे, विजय कराड, प्रशांत नरसाळे सर्व हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.

थेट भेटः हडपसर पोलिस स्टेशन...

Video: हडपसर पोलिसांची असा घेतला बाळाचा शोध...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: pune crime news pune police mocca in hadapsar gangster
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे