धक्कादायक! घरातून बाहेर पडलेल्या युवतीचा आढळला मृतदेह...

प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. पण सायंकाळी उशीरापर्यंत तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पुणे : घरातून बाहेर पडलेल्या युवतीचा रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रतिमा भास्कर कुटगे (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपास करत आहेत.

स्वप्न हिरावले! अभिनेत्री साखरपुडा करणार होती पण...

प्रतिमा मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर वसाहतीतील रहिवासी आहे. प्रतिमा सोमवारी (ता. 20) दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेत काम असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. पण, हडपसर परिसरातील रेल्वे रुळावर सायंकाळी थेट मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांच्या धक्का बसला. प्रतिमाने आत्महत्या केली की तिचा अपघात झाला किंवा तिच्यासोबत काही घातपात घडला, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत पोलिस कसून तपास करत आहेत.

मिस पिंपरी चिंचवड स्पर्धेच्या मानकरी विशाखा यांची 'एक्झिट'...

कुटुंबीयांनी सांगितले की, प्रतिमा सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सायबर कॅफेमध्ये कामासाठी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. पण सायंकाळी उशीरापर्यंत तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा प्रतिमा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. दरम्यान, हडपसर येथील रेल्वे रुळावर एक युवती मृतावस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित युवतीचे वर्णन प्रतिमाशी हुबेहुब जुळत होते. नातेवाईकांनी संबंधित मृतदेह पाहिला असता तो मृतदेह प्रतिमाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पहाटेच्या अंधारात गुपचुप 15 दिवसांच्या मुलीस भेटायला आला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune crime news pratima kutge body found at hadapsar railway
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे